SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लग्नमंडपात स्कॉर्पिओच्या बोनटवर बसून थाटात आली नवरी; पण आता पोलीस घेताय शोध..

लग्न! लग्न म्हणजे हौस, मौज, थाट आणि नवीन नात्यांची सुरुवात. आपल्याला जवजवळ सर्वांनाच माहीती आहे की, लग्न म्हणजे आजकाल लाखो रुपये खर्च करून केलेला समारंभ असतो. कुठे मोठे, कुठे छोटे लग्न तर सध्या कोरोनाच्या काळात हौस-मौज न करता कोरोनाविषयक नियम पाळून नोंदणी विवाह केले जातात.

तुम्हाला माहीती असेलच की, काही दिवसांपूर्वी एक डान्सिंग नवरी खूपच फेमस झाली होती. त्यानंत आता या नवरीची चर्चा सर्वत्र पसरतेय. लग्न कार्य म्हटलं की चर्चा असते ती नवरीच्या लग्नातील पेहरावाची आणि पारंपारिक अंदाजाची! पण या नवरीने मात्र बोनटवर बसून लग्नामंडपात येत साऱ्यांचंच लक्ष वेधून आकर्षित केलं.

Advertisement

लग्नात आपल्या हटके अंदाजामुळे ही नवरी भलतीच फेमस होत आहे. लग्नात हौस म्हणून लग्न मंडपात प्रवेश करताना सगळे पाहताना अवाक् झाले, कारण या नवरीने चक्क गाडीच्या बोनटवर बसून मंगलकार्यात एन्ट्री घेतली आहे. हे सगळं ठीक हो! पण विशेष बाब ही की, या नवरीने बोनटवर बसून चक्क घाटातून लग्नमंडपात जातानाचा एक खास व्हिडिओ देखील काढला आहे. त्यामुळे या नवरीची चर्चा गावभर आहे.

पुणे सासवड मार्गावरील दिवे घाट येथील हा नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील सिध्देश्वर मंगल कार्यालयात या नवरीची दिमाखात रॉयल एन्ट्री होऊन विवाह सोहळा अगदी थाटात पार पडला.

Advertisement

बोनटवर बसणं कायद्याने गुन्हा:

जीवाशी खेळून स्कॉर्पिओ गाडीच्या बोनटवर बसून घाटातून प्रवास करणे ही बाब धक्कादायक आणि कायद्याच्या चौकटीत न बसणारी आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे , पण धोकादायक रितीने प्रवास करणे तिला आता महागात पडलं आहे. अशा प्रकारे बोनटवर हा कायद्याने गुन्हा आहे. दरम्यान नवरी व कुटुंबियांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement