SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

करीना कपूर ‘तिसऱ्या मुला’वरुन अडचणीत..! पोलिसांत गुन्हा दाखल होण्याची शक्यता, नेमकं काय घडलंय पाहा..?

बॉलिवूडची ‘ओजी क्वीन’ अभिनेत्री करीना कपूर-खान हिने तैमूर याच्यानंतर आणखी एका बाळाला काही दिवसांपूर्वी जन्म दिला. गरोदरपणात आलेल्या अनुभवावर तिने एक पुस्तक लिहिले असून, त्याला तिने ‘करीना कपूर-खानस् प्रेग्नेंसी बायबल’ असे नाव दिलेय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी करीना कपूरने तिच्या ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवर सोनोग्राफी हातात पकडलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली होती. करीनानेही तिच्या तिसऱ्या मुलाबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.

Advertisement

मात्र, करीनाचे हे ‘तिसरं मूल’ म्हणजे तिचं पुस्तक असल्याचे समोर आले. मात्र, या ‘तिसऱ्या मुला’वरुनच, म्हणजेच या पुस्तकावरुनच करीना वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. या पुस्तकाला दिलेल्या ‘करीना कपूर-खानस् प्रेग्नेंसी बायबल’ या नावावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात येत आहे.

‘ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डा’चे अध्यक्ष डायमंड युसुर यांनी कानपूरमध्ये एक बैठक घेतली. तीत ‘करीना कपूर-खानस् प्रेग्नेंसी बायबल’ या नावाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला.

Advertisement

सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून करीना कपूर हिच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डा’ने बैठकीत घेतल्याचे समजते. त्यामुळे करीना कपूर अडचणीत सापडली आहे.

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

Advertisement

दरम्यान, करीना कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती किचनमधील ओव्हनमधून एक पुस्तक काढताना दिसते. आपल्या पोस्टमध्ये करीनाने म्हटलेय, की “हा माझा प्रवास आहे. माझ्या दोन्ही प्रेग्नेंसी आणि माझं प्रेग्नेंसी पुस्तक बायबल. काही चांगले दिवस, तर काही वाईट..!”

Advertisement

“काही दिवस मी कामावर जाण्यासाठी उत्सुक होते, तर काही वेळा अंथरुणातून उठणंही कठिण होतं. यात मी गरोदरपणातील माझ्या शारीरिक आणि मानसिक स्थितीबद्दल लिहिलं आहे.. ” असं सांगून करीनाने तिचं पुस्तक हेच तिचं तिसरं मूल असल्याचं स्पष्ट केलंय.

‘अमेझाॅन’वर ठरलेय ‘बेस्ट सेलर’
दरम्यान, करीना कपूर आपल्या या ‘तिसऱ्या मुला’मुळे अडचणीत सापडली असली, तरी तिचे हे पुस्तक ‘अमेझाॅन’वर प्रथम क्रमांकाचे ‘बेस्ट सेलर’ म्हणून ट्रेंडिंग झालेय. अवघ्या काही तासांतच वेगाने पहिल्या क्रमांकावर हे पुस्तक ट्रेंड झाले आहे.

Advertisement