SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चुकीला माफी नाही..! गावकऱ्यांनी कलेक्टरवरच ठोकला 25 लाखांचा दंड..! नेमकं असं काय घडलं..?

महसूल प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना दंड आकारल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे.. मात्र, ‘चुकीला माफी नाही..’ असे म्हणत मध्य प्रदेशातील एका गावातील ग्रामस्थांनी चक्क कलेक्टरलाच (जिल्हाधिकारी) 25 लाख रुपयांचा दंड ठोकला.. नेमकं असं काय घडलं, हे आपण जाणून घेऊ या..

ही घटना आहे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतुल जिल्ह्यातील विकासखंड शहापूर गावातील. या गावातील सियाराम नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. खुनात त्याचा हात असल्याचे सांगून, गुन्ह्याची कबुली देण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर दबाव आणला.

Advertisement

दरम्यान, पोलिस तपासातच त्याचा कुठेही हस्तक्षेप असल्याचे दिसत नव्हते. मात्र, हाती आलेला बकरा तसाच कसा सोडायचा, असा विचार करुन पोलिसांनी ‘या गुन्ह्यातून सुटायचे असेल, तर 10 हजार रुपये दे..,’ अशी मागणी सियारामकडे केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

नंतर पोलिसांनी त्याला सोडले, तरी सतत त्याच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली जात होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून अखेर सियाराम याने घरातील विषारी औषधाचे सेवन करुन आत्महत्या केली. त्यामुळे गावातील वातावरण तापले.

Advertisement

संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामसभा बोलावली. पोलिसांच्या जाचामुळेच सियारामने आत्महत्या केल्याचा आरोप करताना जिल्हा प्रशासनाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. प्रशासनप्रमुख या नात्याने थेट बैतूलच्या जिल्हाधिकाऱ्यांवरच 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

याबाबत माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. ग्रामसभेतील ठरावाची प्रत तेथील जिल्हा सत्र न्यायालयाला पाठविली आहे. आता हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

दरम्यान, यानिमित्ताने ग्रामसभेला जिल्हाधिकाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, गावकऱ्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे या देशातील संविधान सर्वोच्च आणि तितकेच सक्षम असल्याचे सिद्ध झालेय.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement