SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जमिनीची खरेदी करण्यापूर्वी ७/१२ उताऱ्यामधील चुका कशा दुरुस्त करणार? जाणून घ्या..

सध्या थोडीशी जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा इतिहास काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. यामुळे हजारो-लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या जमिनीसाठी कोर्ट-कचेऱ्यांचे चक्कर मारावे लागतात. आपल्याला हे तर माहीतच हवं की, खरेदीपूर्वी जमिनीचा मूळ मालक कोण? नंतर जमिनीत काय बदल झाले. यासाठी तुम्ही ७/१२ ऑनलाईन काढू शकता. हा ७/१२ उतारा मात्र अचूक निघणं आवश्यक असतं; पण त्या ऑनलाईन ७/१२ (Land records) मध्ये जर काही चुका असतील तर त्या कशा दुरुस्त करायच्या ते पाहू..

काय आहे ७/१२ उतारा दुरुस्ती प्रक्रिया?

Advertisement

▪️ दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला आधी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

▪️ या वेबसाईटच्या होम पेजवर सर्वात खाली उजव्या बाजूला ‘७/१२ दुरुस्तीसाठी ई-हक्क प्रणाली’ असे दिसेल, तिथेच खाली या https://pdeigr.maharashtra.gov.in वेबसाईटवर क्लिक करा.

Advertisement

▪️मग PDE (पब्लिक डेटा एंट्री) असे नाव दिसणारे एक पेज ओपन होईल. या पेजवर सर्वात खाली दिलेल्या Proceed to Login या पर्यायावर क्लिक केले की, तिथे तुम्हाला तुमचे अकाऊंट सुरू करायचे आहे. त्यासाठी ‘Create new user‘ यावर क्लिक करायचे आहे.

▪️ आता तुमच्यासमोर ‘New User Sign Up‘ नावाचे नवीन पेज ओपन होईल. नवीन युजर अकाऊंट Sign Up करण्यासाठी तुमची Contact Information भरून सेव्ह बटनावर क्लिक करा.

Advertisement

▪️ याच पेजवर खाली ‘Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction.’ असा मेसेज दिसेल. मग ‘Back‘ या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करा.

▪️ लॉगिन केल्यानंतर ‘Details‘ नावाचे एक पेज उघडेल. येथे Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे अनेक पर्याय दिसतील. यामध्ये सातबारा चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘7/12 Mutations‘ या पर्यायावर वर क्लिक करायचे आहे.

Advertisement

▪️ त्यानंतर तुम्हाला एक पॉपअप मेसेज शो होईल. मग तुम्हाला (युजर) तुमचा रोल सिलेक्ट करावा लागेल. तुम्ही सामान्य नागरिक आहात तर ‘User is Citizen‘ आणि बँकेचे कर्मचारी आहात तर ‘User is Bank‘ या पर्यायावर क्लिक करा.

▪️ आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. तुम्हाला 7/12 मधील चूक दुरुस्ती करायची असल्यामुळे तोच पर्याय निवडा आणि तिथे दुरुस्तीबाबत अर्जात तुम्ही तुमची जी चूक दुरुस्त करायची आहे ती माहिती भरा

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement