‘तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिला सोडचिठ्ठी दे..!’ पुण्यातील बड्या नेत्याला राजकीय गुरुचा अघोरी सल्ला.. पुढं घडलं असं भयंकर..!
प्रत्येकाच्या आयुष्यात योग्य वाट दाखविणाऱ्या गुरुला मोठे महत्व असते. मात्र, काही गुरू आपल्या तुंबड्या भरण्यासाठी चेल्याला भलतीच वाट दाखवितात. मग त्यात सापडल्यावर चेल्याबरोबरच अशा गुरूलाही जेलची हवा खावी लागते.
पुण्यातील अशाच एका राजकीय गुरुच्या सल्ल्यामुळे एक हसता-खेळता संसार उध्दवस्त झाला. रघुनाथ येंमुले (वय ४८), असे या बड्या राजकीय गुरुचे नाव आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत 27 वर्षीय उच्चशिक्षित पीडित विवाहितेने कौटुंबिक छळाची फिर्याद दिली आहे. त्यानुसार येंमुले याच्यासह विवाहितेचा उद्योजक पती, युवक काँग्रेसचा सरचिटणीस गणेश गायकवाड व त्याच्या कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिची जन्मवेळ चुकीची असून, तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर ही तुझी बायको म्हणून कायम राहिली, तर तू मंत्री काय, साधा आमदारही होणार नाहीस. तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे. तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे..” असा अघोरी सल्ला या राजकीय गुरुने प्रतिष्ठित गायकवाड कुटुंबाला दिला.
रघुनाथ येंमुले याच्या या सल्लामुळे उद्याेजक गणेशचे माथे ठणकले. बायकोपासून सुटका करुन घेण्यासाठी त्याने तिला सिगारेटचे चटके दिले. अगदी बहिरेपणा येईपर्यंत अमानूष मारहाण केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. सासरी 23 जानेवारी 2017 पासून असा छळ करण्यात आल्याचे पीडित विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.
सुनेचा छळ करण्यासाठी प्रतिष्ठित कुटुंबाला भाग पाडल्याबद्दल रघुनाथ येंमुल यास अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पीडित विवाहितेच्या सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पैकी सात जणांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
पुण्यातील बाणेरमधील ‘आयव्हरी इस्टेट’ भागात हा राजकीय गुरू येंमुले राहतो. राजकीय क्षेत्रापासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. अनेक जण त्याच्या दरबारी हजेरी लावून आपल्या समस्या मांडत असतात. त्यामुळे त्याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.