SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सुपरस्टार रजनीकांत यांचा धक्कादायक निर्णय..! चाहत्यांना बसला धक्का, जाणून घेण्यासाठी वाचा..!

जनतेची सेवा करण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी ‘मक्कल मंद्रम’ या नावाने राजकीय पक्षाची स्थापनाही केली.

आपल्या पक्षाच्या माध्यमातून ते राज्याच्या निवडणुकीत सहभागी होणार होते. ‘थलैवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांचा दक्षिण भारतातच नव्हे, तर पूर्ण देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कसा टिकाव लागणार, असा प्रश्न राजकीय क्षेत्रातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना पडला होता.

Advertisement

मात्र, आता या दाक्षिणात्य सुपरस्टारने मोठा निर्णय घेतलाय. आता आपण राजकारणात पाऊलही ठेवणार नसल्याचे रजनीकांत यांनी जाहीर केले आहे. वर्षभरापूर्वी स्थापन केलेला ‘मक्कल मंद्रम’ हा आपला राजकीय पक्षही बरखास्त करीत असल्याचे त्यांनी जाहीर केलेय.

राजकारणाच्या माध्यमातून नव्हे, तर आता एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याचे रजनीकांत यांनी सांगितलेय. त्यासाठी त्यांनी ‘रजनी रसीगर नरपानी मंदराम’ अर्थात ‘Rajinikanth Fans Welfare Forum’ नावाची एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आता ते लोकसेवा करणार आहेत.

Advertisement

रजनीकांत यांनी एका पत्रकाद्वारे ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्यात त्यांनी म्हटलेय, की “मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा, त्या माध्यमातून राजकारणात उतरण्याचा विचार केला होता; परंतु वेळ अशी होती की ते शक्य झालं नाही.”

“आता भविष्यातही राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्यामुळे ‘रजनी मक्कल मंद्रम’ आता लोकांच्या हितासाठी ‘फॅन चॅरिटी फोरम’ म्हणून काम करील.” रजनीकांत यांनी ट्विटरवर हे निवेदन ‘पोस्ट’ केले आहे. आपला निर्णय घेण्याआधी रजनीकांत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

Advertisement

प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी २९ डिसेंबर २०२० रोजीच जाहीर केलं होतं; पण काही दिवसांपासून ते राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या; पण आता सर्व चर्चांना पूर्णविराम देताना रजनीकांत यांनी राजकारणातील परतीचे सर्व दोर कापले आहेत.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच रजनीकांत यांनी राजकारणात ‘एन्ट्री’ करणार नसल्याची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement