आपल्या पृथ्वीवर अंतराळातून लघुग्रह, उल्कापिंडांच्या रूपात अनेकदा संकटं येत असतात. दरम्यान, आता पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या अशा संकटापासून चीन पृथ्वीला आर्मागेडॉनपासून (Armageddon) वाचवणार आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता कमी असली तरी तज्ज्ञ, शास्रज्ञ कसल्याही प्रकारचा धोका स्वीकारायला तयार नाहीत.
चीनची विशेष योजना कोणती?
पृथ्वीच्या दिशेने एक मोठा लघुग्रह (Asteroid) येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. चीन पृथ्वीकडे येणाऱ्या या लघुग्रहावर त्यांच्याकडे असलेल्या सर्वात मोठ्या रॉकेटच्या (Rocket) माध्यमातून हल्ला करणार आहे.
त्यामुळे या लघुग्रहावर 23 रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करून त्याची लघुग्रहाची दिशा बदलण्याची योजना चीनने आखली आहे. चीन ज्या लघुग्रहावर हल्ला करण्याची योजना आखत आहे त्याचे नाव बेन्नू असे आहे. हा लघुग्रह 7750 कोटी किलोग्रॅम वजनाचा आहे.
महत्वाचं म्हणजे, हा लघुग्रह जर पृथ्वीच्या साधा जवळून जरी गेला तरी प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. कारण या लघुग्रहाची गती आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे एक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि ती ऊर्जा पृथ्वीचं नुकसान करणारी ठरू शकते.
नेमकं काय घडू शकतं….?
ॲस्ट्रॉइड बेन्नू (Bennu) हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये सन 2175 ते 2199 यादरम्यान येण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या आकाराचा असल्याचं सांगितलं जातंय.
बेन्नू हा लघुग्रह समज पृथ्वीवर आदळला तर सुमारे 1200 मेगाटन (1,200 megatons) कायनेटिक उर्जा उत्पन्न होईल. म्हणजेच अंदाजे ही ऊर्जा हिरोशिमावर काही वर्षांपूर्वी टाकलेल्या अणुबॉम्बच्या 80 हजार पट जास्त असेल. डायनासोरचे अस्तित्व संपवणाऱ्या लघुग्रहाचा विचार केल्यास त्याने सुमारे 100 दशलक्ष मेगाटन ऊर्जा निर्माण केली होती. त्या तुलनेत बेन्नूच्या माध्यमातून कमी उर्जा निर्माण होईल.
चीनच्या योजनेनुसार, चीनच्या नॅशनल स्पेस सायन्स सेंटरने मांडलेल्या गणितानुसार ‘बेन्नू’ लघुग्रहाची दिशा बदलायची असेल, तर 23 रॉकेट प्रक्षेपित करावी लागतील. (Chinese scientists are planning to fire more 23 rockets into space to divert Asteroid) त्यासाठी चीन लाँग मार्च 5 या रॉकेटचा वापर करणार आहे. या एका रॉकेटचे 900 मेट्रिक टन म्हणजेच 9 लाख किलोग्रॅम एवढे वजन आहे. ही 23 रॉकेट जेव्हा बेन्नू या लघुग्रहावर आदळतील तेव्हा तो पृथ्वीपासून 9 हजार किलोमीटर दूर जाईल. हे संशोधन Icarus नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
नासाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या प्लॅनपेक्षा चीनची योजना थोडी विस्तृत आणि खूपच खर्चिक आहे. अमेरिकेच्या नासानेदेखील सुद्धा ‘हायपरवेलोसिटी ॲस्ट्रॉइड मिटिगेशन फॉर एमर्जन्सी रिस्पॉन्स’ तयार केला आहे. यात 30 फूट लांब स्पेसक्राट लघुग्रहावर आदळवले म्हणजेच टक्कर दिली जाईल. नासाने लावलेल्या अंदाजानुसार हॅमर स्पेसक्राफ्ट्स लघुग्रहावर 34 ते 53 वेळा आदळवावी लागतील. म्हणजेच प्रत्येक स्पेसक्राफ्ट एक एक टक्कर देईल. नासाचे हा प्रयोग ‘बेन्नू लघुग्रह’ पृथ्वीवर टक्क देण्यापूर्वी 10 वर्षे आधी सुरू होईल. जेणेकरून प्रत्येक टक्करीनंतर लघुग्रह आपला मार्ग बदलत राहील. मग किंबहुना कमी टक्करमयेच हा लघुग्रह सुरक्षित अंतरावर जाऊ शकतो.