SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हम दो- हमारे दो..!’ एकच मूल असणाऱ्या कुटुंबावर सवलतींची लयलूट, उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या धोरणाचा मसुदा जाहीर..

आज जागतिक लोकसंख्या दिन… या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘लोकसंख्या धोरण- 2021-30’ जाहीर केले. उत्तर प्रदेश राज्य विधि आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक (नियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याण)चा मसुदा सादर केला आहे.

उत्तर प्रदेशच्या नव्या मसुद्यानुसार, पालकांनी एका मुलावर समाधान मानून नसबंदी केल्यास, त्या मुलाला विविध सरकारी लाभ मिळणार आहेत. हे मूल 20 वर्षांचे होईपर्यंत त्याच्यावर मोफत आरोग्य उपचार, शिक्षण, विमा, शिक्षण संस्था, तसेच सरकारी नोकर्‍यांमध्ये प्राथमिकता देण्यात येणार आहे.

Advertisement

तसेच, जास्तीत जास्त दोन मुले असणाऱ्या पालकांनाही सरकारतर्फे विशेष सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. त्यात सरकारी कर्मचारी असल्यास दोन अतिरिक्त पगारवाढ, पदोन्नती, 12 महिन्यांची प्रसूती वा पितृत्व रजा दिली जाईल.

जोडीदारासाठी विमासंरक्षण, सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये सूट, पीएफमध्ये नियोक्तांच्या योगदानात वाढ, यांसारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत. सरकारी नोकरदार नसणाऱ्यांना वीज, पाणी, घरपट्टी, गृहकर्जात सवलत देण्याचा प्रस्ताव मसुद्यात आहे.

Advertisement

दुसरीकडे, दोनपेक्षा जास्त मुले असल्यास कुटुंबाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. या मुलांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही. तसेच कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढविता येणार नाहीत. याबाबत आयोगाने 19 जुलैपर्यंत जनतेची मते मागविली आहेत.

तसेच, दोन पेक्षा अधिक मुले असणार्‍या व्यक्तींना सरकारी नोकर्‍यांसाठी अर्ज दाखल करता येणार नाही. नोकरीत बढतीची संधी नाकारली जाऊ शकते. वेगवेगळ्या सरकारी योजना, अनुदानांचा लाभही दिला जाणार नाही.

Advertisement

विधेयक लागू झाल्यानंतर सरकारी अधिकारी-कर्मचारी व लोकप्रतिनिधींना या कायद्याचे पालन करण्याबाबत शपथपत्र सादर करावे लागेल. हे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तिसर्‍या मुलास जन्म दिल्यास पदोन्नती थांबविणे, सरकारी कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्याचीही शिफारस मसुद्यात केली आहे.

तसेच लोकप्रतिनिधीची निवड रद्द केली जाईल, त्यापुढे निवडणूक लढविण्यास मनाई केली जाणार आहे. तथापि, तिसर्‍या मुलाला दत्तक घेण्यावर कोणतेही बंधने नसल्याचे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement