SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षण होईल अजून सोपे, 35,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ‘हे’ पाच लॅपटॉप कोणते पाहा..

कोरोना प्रादुर्भावामुळे जगात आता ऑनलाईन शिक्षणावर जास्त भर देण्यात येत आहे. मुले सध्या घरीच असल्यामुळे गेमिंगची हौस चांगल्या प्रकारचे स्मार्टफोन्स व गेमिंग लॅपटॉप घेऊन भागवत आहेत. तुमच्या खिशाला परवडतील असे 5 प्रसिद्ध कंपन्यांचे लॅपटॉप कोणते ते जाणून घ्या..

35,000 पेक्षा कमी किंमतीचे लॅपटॉप्स (Laptops under 35,000):

Advertisement

1) एचपी 15s-gr0006au (HP 15s-gr0006au)

HP 15s-gr0006au दमदार पॉवर आणि खिशाला परवडणाररा लॅपटॉप आहे. 34,019 रुपयांना हा लॅपटॉप HP Store वर उपलब्ध आहे. यातही 4GB रॅम, 1TB एचडीडी आणि Windows 10 होमसह एएमडी रायझन 3-3250U येते. या 15.6 इंचाचा लॅपटॉपमध्ये एएमडी रॅडियन ग्राफिक्स आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट 2019 दिले आहे.

Advertisement

2) एचपी क्रोमबुक x360 (Chromebook x360)

एचपी क्रोमबुक x 360 मध्ये Intel Celeron N4020 प्रोसेसर आणि 12 इंच स्क्रीन आहे. टॅब्लेटसारखी या नोटबुकची टचस्क्रीन फ्लिप करता येते. ड्युअल-अ‍ॅरे (Dual-array) मायक्रोफोन आणि एक एचपी ट्रूव्हिजन एचडी कॅमेरा या लॅपटॉपमध्ये आहे.

Advertisement

3) एचपी 245 जी8 (HP 245 G8)

काम कमी असेल, जास्त वापर नसेल होणार तआणि कधीतरी गेम खेळण्यासाठी हा लॅपटॉप चांगला आहे. HP 245 G8 लॅपटॉपमध्ये रायझन 3 एपीयूसह वेगा 6 ग्राफिक्स येते. या लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम आणि 1 टीबी एचडीडी स्टोरेज देखील आहे. याची किंमत साधारणपणे 32 हजारांपर्यंत आहे.

Advertisement

4) आसुस व्हीवोबुक M515DA-EJ301T (Asus Vivobook M515DA-EJ301T)

एसुस व्हीवोबुक M515DA-EJ301T मध्ये एएमडी रायझन 3 3250 यु प्रोसेसरसह इंटिग्रेटेड रेडियन ग्राफिक्ससोबत येतो. या लॅपटॉपमध्ये 4GBरॅम आणि 1TB एचडीडी स्टोरेज आहे. या 15.6 इंचाच्या लॅपटॉपमध्ये विंडोज 10 आहे.

Advertisement

5) लेनोवो आयडियापॅड ड्युएट क्रोमबुक (Lenovo Ideapad Duet Chromebook)

लेनोवो आयडियापॅड ड्युएट क्रोमबुक हा 27,000 रुपयांमध्ये येणार छान नोटबुक आहे. 10.1 इंचाच्या या नोटबुकमध्ये 4GB रॅम, 128GB स्टोरेज आणि Mediatek P60 टी ऑक्टा कोअर प्रोसेसर येतो. याची खास गोष्ट म्हणजे जर आपल्याला सिनेमे वगैरे पाहायचे असतील तर आपण की-बोर्ड वेगळा करू शकतो.

Advertisement