SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रसिद्ध अभिनेत्याकडून हुंड्यासाठी बायकोचा छळ..! चौकशीत पोलिसांना सहकार्यही करेना, काेर्टाचा आत्मसमर्पण करण्याचा आदेश..

हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाच्या घटना आपण रोजच वाचतो, पाहतो, ऐकतो.. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार सर्वसामान्य लोकांच्या घरातच नव्हे, तर चांगल्या सुखवस्तू समजल्या घरातूनही समोर आलेल्या आहेत.

अशा प्रकारापासून किमान नाट्यक्षेत्र तरी दूर असेल, असे वाटले होते. पण ‘सब घोडे बारा टक्के..’ असल्याचेच दिसते. कारण, टीव्हीवरील एका प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात त्याच्या बायकोने चक्क कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहेत.

Advertisement

आदित्य जयन असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात बायको अम्बिली देवी यांनी चक्क हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. टीव्ही अभिनेत्री असणाऱ्या अम्बिली देवी हिच्यासोबत दोन वर्षांपूर्वी आदित्यचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांतच आदित्यने तिच्याकडे हुंड्याची मागणी सुरू केली. परंतु, तिने हुंडा देण्यास साफ नकार दिला.

माहेराहून हुंडा आणत नसल्याने आदित्य तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचा आरोप अम्बिलीने केला आहे. तसेच तिचे सोन्याचे दागिने आणि 10 लाख रुपयेही त्याने गायब केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement

आदित्यकडून छळ वाढल्याने अम्बिलीने केरळ पोलिसांत धाव घेतली. पत्नीने केलेले आरोप खोटे असल्याचे तो सांगतो. पोलिसांनी आदित्यची चौकशी करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सहकार्य करण्यास तयार नसल्याने पोलिसांनी केरळ उच्च न्यायालयात तक्रार केली.

केरळ उच्च न्यायालयाने १३ जुलैपर्यंत आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे. त्याला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळू शकतो. परंतु, पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही.

Advertisement

तसेच साक्षीदारांना धमकाविण्याचा किंवा पत्नीच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास कडक शासन करण्याचा इशारा कोर्टाने दिला आहे. आदित्यच्या या प्रकरणामुळे दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement