SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आमिर खानच्या भावाचाही घटस्फोट..! पत्नीने केले होते गंभीर आरोप, जाणून घेण्यासाठी वाचा..

‘मिस्टर परफेक्टनिस’ व प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा मागील आठवड्यात घटस्फोट झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आमिर खान याच्या घरातील आणखी एक जण आपल्या बायकोपासून यापूर्वीच वेगळे झाल्याचे पुढे आले आहे.

आमिर खानचा भाऊ हैदर अली याने पत्नी इव्हा ग्रोव्हर हिला काही वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी दिली होती. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असणाऱ्या इव्हाने अनेक मालिकांमध्ये, तसेच काही चित्रपटांमध्येही काम केलेले आहे.

Advertisement

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक ताहीर हुसेन यांचा हैदर अली हा लहान मुलगा, तर आमिर खान याचा लहान सावत्र भाऊ आहे. त्याने ‘दिल तो दीवाना है’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हैदर व इव्हा यांनीही लव्ह मॅरेज केले होतो. त्यांना एक मुलगीही आहे.

लग्नाच्या काही वर्षांनंतरच हैदर व इव्हा यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. घरगुती हिंसेचे आरोप इव्हाने हैदरवर केला होता. त्यामुळे बाॅलिवुडमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर 2008 मध्ये या जोडप्याने काडीमोड घेतला. रोजच्या हिंसेपासून सुटका होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे इव्हाने त्यावेळी सांगितले होते.

Advertisement

टीव्हीवरील फेमस शो ‘ऑफिस-ऑफिस’ आणि ‘माय फ्रेंड गणेशा’ यामध्येही इव्हाने काम केले आहे. भारतात सुरक्षित वाटत नसल्याचे वक्तव्य केल्यामुळे आमिर खानवर चोहोबाजूने टीका होत असताना, हैदर आपल्या भावाच्या मदतीला धावून गेला होता. त्यामुळे त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement