SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हेल माशाची ‘उलटी’ची दिली जाते कोटी रुपये किंमत; पोलिसांनी तस्करी करताना केली एकाला अटक

तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मात्र हे खरे आहे. समुद्रातील व्हेल (Whale) माशाने केलेली ‘उलटी’ बाजारात (Whale vomit) तस्करीसाठी (Smuggling) घेऊन जात असताना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका जणाला अटक केली आहे.

प्रकरण नेमकं काय?

Advertisement

▪️ समुद्रात, महासागरात आढळणाऱ्या व्हेल माशाची उलटी मोटारसायकलवरुन विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या खेड (रत्नागिरी) येथील एकाला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे ताब्यात घेतले.

▪️ अधिक तपास केला असता, व्हेलच्या पाच किलो उलटची किंमत भारतीय बाजारात सुमारे 5 कोटी असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल 20 कोटींच्या दरम्यान असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले.

Advertisement

▪️ व्हेल माशाची उलटी इतकी महाग असल्याने त्याला समुद्रातील तरंगतं सोनं असंही म्हटलं जातं. पोलिसांनी त्याच्याकडून ही 5 किलो वजनाची व्हेलची उलटी व त्याची सिल्व्हर रंगाची स्कूटी जप्‍त केली आहे.

▪️ रत्नागिरी जिल्ह्यातील हे दुसरे प्रकरण आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आणखी कुणाचा यात सहभाग आहे का याचा तपास रायगड पोलीस करीत आहेत.

Advertisement

व्हेल माशाच्या उलटीचा वापर कशासाठी होतो?

व्हेल माशाच्या उलटी वापर उत्तम क्वालिटीचा परफ्यूम, औषधे, अत्यंत महागडे सिगार बनविण्यासाठी, मद्य व खाद्यपदार्थांचा स्वाद व चव वाढवण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे सुगंधीत अत्तर बनवण्यासाठी या उलटीला जास्त मागणी असते.

Advertisement

वन्यप्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत, ‘व्हेल मासा’ संरक्षित असल्याने व्हेलच्या उलटीची खरेदी-विक्री बेकायदेशीर आहे. दुर्मिळ असलेल्या व्हेल माशाने खोल समुद्रात केलेली उलटी काही काळाने हळूहळू दगडासारखी टणक होत जाते.

दगडासारखी बनलेली उलटी प्रवाहासोबत किनार्‍याला येते किंवा मच्छीमारांच्या जाळ्यात सापडते. यामध्ये अँम्ब्रीन, अँब्रोक्झिन, अँब्रोनिल ही रसायने असतात, अशी माहीती आहे. विक्रीला बंदी असल्याने तिची तस्करी होत असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले.

Advertisement