SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुलीच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन पोलिसाची महिला शिपायासोबत हाॅटेलमध्ये मजा, बायकोच्या फोन काॅलमुळे बिंग फुटले.. पाहा नेमकं काय घडलं..?

मुलीच्या लग्नाचे कारण सांगून सुटीवर गेलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची गुलछबूगिरी त्याच्या बायकोच्या एका फोन काॅलमुळे समोर आली. मात्र, या प्रकारामुळे उत्तर प्रदेश पोलिसांची मान शरमेने खाली गेली आहे..

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बिघापूरमध्ये ही घटना घडली. मुलीच्या लग्नाचे कारण सांगून इथल्या एका पोलिस अधिकाऱ्याने पोलिस अधीक्षकांकडे सुट्टी मागितली. लग्नाचे काम असल्याने पोलिस अधीक्षकांनीही आढेवेढे न घेता, त्यांची सुट्टी मंजूर केली.

Advertisement

..पण मुलीचे लग्न राहिले बाजूला, नि हे महाशय चक्क आपल्याच खात्यातील एका महिला शिपायासोबत मजा मारायला एका हॉटेलमध्ये गेले. हाॅटेलमध्ये या दोघांनी बरीच मजामस्ती केली, त्याचे व्हिडीओही काढले. मात्र, आता ही मजामस्ती त्यांच्या चांगलीच अंगाशी आलीय.

हा पोलिस अधिकारी सहकारी महिलेसोबत हाॅटेलमध्ये मजा मारत असताना, नवऱ्याच्या काळजीपोटी त्याच्या बायकोने त्याला अनेक फोन केले. मात्र, हा अधिकारी कामात फार ‘व्यस्त’ असल्याने, त्याने दोन्ही मोबाईल बंद करुन ठेवले होते.

Advertisement

आपल्या नवऱ्याचा खून झाला की काय, या भीतीने घाबरलेल्या बायकोने थेट पोलिस अधीक्षकांनाच फोन केला नि सगळा प्रकार समोर आला. पोलिस अधिकारी आणि महिला शिपायाने हॉटेलमध्ये केलेल्या मजामस्तीचं बिंग अखेर फुटले.

अवघी पोलिस यंत्रणा कामाला लागली. या अधिकाऱ्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन शोधले असता, कानपूरनगरमधील एका हॉटेलजवळ त्याचा मोबाईल बंद झाल्याचे समाेर आले. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली असता, हा पोलिस अधिकारी व महिला शिपायाने त्यांची ओळखपत्रे दाखवून तेथील खोली भाड्याने घेतल्याचे समजले. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

Advertisement

दरम्यान, हाॅटेलमध्ये केलेल्या मजामस्तीचे व्हिडीओ काढणेही या अधिकाऱ्याच्या अंगलट आलेय. पोलिस अधिकारी व शिपायातील शारीरिक संबंधांची क्लिप व्हायरल झाली असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्याचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे.

तसेच, ही महिला शिपाई त्या दिवशी सुट्टी घेऊन हाॅटेलवर गेली होती की ड्युटीवर असताना, याचीही चौकशी करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक हा तपास करीत असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर या दोघांवरील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement