SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत आयाेगाची मोठी घोषणा, पाहा नेमका काय निर्णय घेण्यात आलाय..?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने, तसेच अजूनही कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषदा व 33 पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकांची प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग, तसेच 33 पंचायत समित्यांमधील 130 जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै रोजी राज्य शासनाने कोविडमुळे या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

Advertisement

राज्य सरकारची विनंती व सर्वोच्च न्यायालयाचा 6 जुलैचा आदेश लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने कोविडची परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविले होते. हे अहवाल सादर करण्यात आल्यानंतर आयोगाने या निवडणुका आज आहेत, त्याच टप्प्यावर स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहिताही आजपासून शिथिल करण्यात आली. कोविडची परिस्थिती सुधारल्यावर पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे घेण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मदान यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, कोरोना संसर्ग अजूनही आटोक्यात आलेला नसल्याने पोटनिवडणुका स्थगिती करण्याची मागणी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली होती.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement