SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनामुक्त गावांत 8वी ते 12वीचे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरू होणार, शिक्षण विभागाची माहीती

राज्यात कोरोनामुक्त गावांमध्ये टप्प्याटप्प्याने 8वी ते 10वी चे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली. शालेय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या परिपत्रकात काही बदल करून नवे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून काल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार 15 जुलैपासून शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

राज्यात आठवी ते दहावीचे वर्ग (8th to 10th) सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना असलेले परिपत्रक सोमवारी प्रसिद्ध केले होते. मात्र अवघ्या काही तासांतच ते परिपत्रक मागे घेण्यात आले. या आधीच्या परिपत्रकात काही बदल करून नव्या मार्गदर्शक सूचना असलेले नवीन परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून काल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले.

Advertisement

शालेय शिक्षण विभागाच्या नवीन परिपत्रकात काय?

▪️ विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी ‘चला मुलांनो शाळेत चला’ (Back to School) ही मोहीम राबवण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी आवश्यक आहे.

Advertisement

▪️ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी पालकांची लेखी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. शाळा सुरू होताच गर्दी टाळण्यासाठी शालेय परिसरात प्रवेश देऊ नये.

▪️ विद्यार्थ्यांची जास्त संख्या असणाऱ्या शाळा दोन सत्रात भरवण्यात याव्यात. एका बाकावर एक विद्यार्थी बसेल. कोरोना प्रादुर्भावामुळे मास्कचा व सॅनिटायझरचा वापर असे शाळांसाठी आधी घालून दिलेले कोरोनाविषयक नियम पाळावे लागणार आहे.

Advertisement

▪️ ज्या गावांत मागील एक महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसेल तसेच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमताने केला असेल, अशा गावांत इ. 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल.

▪️ ग्रामपंचायत पातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची समिती गठीत करावी.

Advertisement

▪️ शिक्षकांच्या लसीकरणास प्राधान्य द्यावे व शिक्षकांच्या लसीकरणासाठी (Vaccination) जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करून त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.

▪️ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास शाळा तात्काळ बंद करून निर्जंतुकीकरण करण्याचे आवश्यक आहे. अशा कोरोनाबाधित विद्यार्थ्यांचे विलगीकरण करून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करावेत.

Advertisement

▪️ कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो, याचा कृती आराखडा तयार करावा.

शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र शाळेला प्रदान करावे, शाळा व्यवस्थापनाने या प्रमाणपत्राची पडताळणी करावी. शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोनासंबंधित सुरक्षिततेच्या उपायांबाबत जनजागृती करावी, मानसिक आरोग्याच्या समस्या सांगणाऱ्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचे नियोजन करावे असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement