SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बॉलिवूडवर शोककळा! दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजिडी किंग, दिग्गज अभिनेते, ज्येष्ठ कलाकार ‘दिलीप कुमार’ (Tragedy King DilipKumar) यांचं निधन झालं आहे.

दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, आज पहाटे उपचार सुरू असताना अभिनेते दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप (Actor Dilip Kumar passes away) घेतला. आज बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीप कुमार (Dilipkumar) यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते.

Advertisement

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा 6 जूनला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तसेच दिलीप कुमार यांना 11 जूनला डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार यांना मागील काही वर्षांपासून किडनीचा आणि न्यूमोनियाचा त्रास होत होता. दिलीप कुमार यांचा 94 वा वाढदिवस हा हॉस्पिटलमध्येच साजरा करण्यात आला होता.

श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, आज प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ही देण्यात आला होता. परंतु आज बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड (Bollywood) आणि देशात शोककळा पसरली आहे.

‘द फर्स्ट खान’ विषयी जाणून घेऊया..

दिलीप कुमार यांचं पूर्ण नाव ‘मोहम्मद युसूफ खान’ (Mohammed Yusuf Khan) होतं. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता. बॉलिवूडमध्ये त्यांना ‘The First Khan’ म्हणून अशी ओळख आहे. हिंदी सिनेसृष्टीतील मेथड ॲक्टिंगचं क्रेडिट दिलीप कुमार यांनाच दिलं जात होतं. याशिवाय त्यांना ट्रॅजिडी किंग म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी खूप सिनेमे केले. 1944 साली रिलीज झालेला ‘ज्वारभाटा’ हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट तर 1998 मधील ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement