SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून चौघांना संधी..! 43 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, पहा कोणा-कोणाची लॉटरी लागली.?

मोदी मंत्रीमंडळाच्या विस्तारात आज सायंकाळी ६ वाजता 43 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, त्यात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा मोदी मंत्रीमंडळात समावेश झाला आहे. सध्या मोदी मंत्रिमंडळात 53 मंत्री होते, आता ही संख्या वाढून 81 झाली आहे.

मोदी सरकारचा विस्तार होणार असल्याने दिल्लीत आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला होता. संभाव्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार असलेल्या नेत्यांसोबत सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. संभाव्य आव्हानांबाबत मंत्र्यांना कल्पना दिली.

Advertisement

पुढील नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश
नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीपसिंह पुरी, मनसुख मंडाविया, भुपेन्द्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुरागसिंह ठाकूर, अनुप्रियासिंह पटेल, डॉ. सत्यपालसिंह बघेल.

राजीव चंद्रशेखर, शोभा करंडलाजे, भानूप्रतापसिंग वर्मा, दर्शना विक्रम जरदोष, मीनाक्षी लेखी, अनपुर्णा देवी, ए. नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवूसिंह, भागवत खुपा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, डॉ. भागवत कराड, डॉ. राजकुमार सिंह, डॉ. भारती पवार, बिस्वेश्वर तडू, शंतनू ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, डॉ. एल. मुरगन, निसित प्रमाणिक

Advertisement

नव्या मंत्रिमडळाची वैशिष्ट्ये

  • मंत्रीमंडळात 27 ओबीसी नेत्यांचा समावेश
  • ४३ पैकी २१ नवे चेहरे
  • ७ विद्यमान मंत्र्यांना कॅबिनेट पदावर बढती
  • १२ एससी, ८ एसटी नेत्यांचा समावेश
  • १३ वकील, ६ डॉक्टरांचा समावेश
  • युवा वर्गाला अधिक स्थान

रावसाहेब दानवेसह जुन्या मंत्र्यांना हटवलं
मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्यापूर्वी अनेक जुन्या केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामे दिले.

Advertisement

या मंत्र्यांचा राजीनामा
रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, देबोश्री चौधरी, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, रावसाहेब दानवे-पाटील, सदानंद गौड़ा, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी, अश्विनी चौबे, थावरचंद गहलोत.

महाराष्ट्राचे आता ८ मंत्री
मोदी मंत्रीमंडळात यापूर्वी महाराष्ट्रातून ६ मंत्र्याचा समावेश होता. दोन मंत्र्यांचा राजीनामा घेताना महाराष्ट्राला मोदी सरकारने ४ नवे मंत्री दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या वाट्याला ८ मंत्रीपदे आली आहेत.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement