SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

माहीला लागलाय भलताच नाद..! बायको साक्षीची उडालीय झोप.. पाहा नेमकं काय झालंय..?

भारताचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendrasing Dhoni) आज 40 वा वाढदिवस. त्यानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्याच्या बायकोने, साक्षीने आपल्या नवऱ्याला एका भलत्याच गोष्टीचा नाद लागल्याची तक्रार केलीय.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून धोनी फक्त आयपीएल खेळत असल्याने त्याच्याकडे बऱ्यापैकी मोकळा वेळ आहे. त्यामुळे त्याला वेगळाच नाद लागला असून, त्यामुळे त्याची बायको साक्षी मात्र चांगलीच वैतागली आहे. अक्षरशः रात्रीची झोप उडाल्याचे खुद्द साक्षीनेच एका मुलाखतीत सांगितले.

Advertisement

साक्षीने सांगितले, की “माहीला व्हिडिओ गेम खेळणे खूप आवडते. त्यातही पब्जी (Pubji). रात्री झोपेतही तो पब्जीबद्दलच (आता बीजीएमआय) बडबडत असतो. क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध जसे डावपेच तो आखतो, तसेच डावपेच तो पब्जी खेळतानाही आखत असतो.”

“पब्जीने थेट आमच्या बेडरुमपर्यंत शिरकाव केलाय. दिवसभर माही एवढा पब्जी खेळतो, की रात्री झोपेतही तो पब्जीबद्दलच बडबड करीत असतो. हेडफोन घालून एकटाच धोनी व्हिडीओ गेम खेळताना बोलत असतो. कधी कधी तो आपल्यासोबत बोलतोय का, असे वाटते, परंतु तो व्हिडीओ गेमवर बोलत असतो,” अशी तक्रार साक्षीने केली आहे.

Advertisement

अर्थात, धोनाला पब्जीचे अगदी वेड लागले असले, तरी क्रिकेटच्या मैदानात धोनी आपली एकाग्रता अजिबात ढळू देत नाही. पब्जीची त्याला आवड असली, तरी क्रिकेट हेच त्याचे पहिले प्रेम असल्याचेही साक्षीने स्पष्ट केले होते.

दरम्यान, कोरोनामुळे आयपीएल २०२१ अर्ध्यातच रद्द करण्यात आली होती. स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्यास अजून बराच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे हा मोकळा वेळ धोनी आपल्या कुटुंबासमवेत घालवत आहे. पत्नी साक्षीच्या वाढदिवसाला त्याने एक भारी कार नुकतीच भेट दिली होती.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement