SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘अमेझॉन’वर एक लाखाचा एसी विकला 5900 रुपयांना..! चूक लक्षात येईपर्यंत ग्राहकांनी साधला डाव, पहा नेमकं काय घडलं..?

ई-कॉमर्स कंपन्या जास्तीत जास्त ग्राहक मिळविण्यासाठी सतत ‘बंम्पर सेल’ जाहीर करीत असतात. मात्र, जगातील नंबर वन ई-काॅमर्स कंपनी असणाऱ्या ‘अमेझॉन’ला (Amezon) अशाच एका वस्तूचा ‘सेल’ (Sell) चांगलाच महागात पडला. मात्र, या प्रकारात ग्राहकांनी मोठा डाव साधला..

अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटवर कंपनीने तब्बल 1 लाख रुपयांचा तोशिबा एअर कंडीशनर (AC) अवघ्या 5900 रुपयांत विक्रीसाठी ठेवला होता. ही बाब लक्षाच येताच, त्यावर ग्राहकांच्या उड्या पडल्या.

Advertisement

एकदम एसीची मागणी वाढल्याचे पाहून कंपनीने चेक केले असता, आपण काय गोंधळ घातलाय, याची त्यांना जाणीव झाली; पण तोपर्यंत अनेक ग्राहकांनी हा एसी खरेदी केला होता.

अमेझॉनवर सोमवारी (5 जुलै) तोशिबा कंपनीचा हा एसी विक्रीसाठी ठेवला होता. सुमारे 1.8 टन, 5 स्टार इन्वर्टरसह ग्राहकांना ऑफर केला होता. एसीची मूळ किंमत 96,700 रुपये असताना, चक्क 94 टक्के सूट देऊन हा एसी केवळ 5900 रुपयांत विकला जात होता.

Advertisement

तब्बल 90,800 रुपयांचा डिस्काऊंट दिला होता. शिवाय या ऑफरमध्ये 278 रुपये महिन्याचा EMI दाखविला होता. आता इतक्या स्वस्तात एसी मिळत असल्यावर ग्राहकांच्या उड्या पडणार नाही तर काय.. एसी खरेदीसाठी एकच झुंबड उडाली.

तोशिबा एसीची मागणी एकदम वाढल्याचे पाहून ‘अमेझॉन’ने चेक केले असता, सगळा प्रकार समोर आला. हा एसी 59,490 रुपयांत विक्रीसाठी ठेवायचा होता. मात्र, चुकून 5900 रुपये झाले नि हा प्रकार झाला. आता कंपनीने आपली चूक दुरुस्त केली असून, हा एसी 59,490 रुपयांना विक्रीसाठी ठेवला आहे.

Advertisement

अमेझॉनने आता तोशिबा एसीच्या मूळ किमतीत 20 टक्क्यांची सवलत दिली आहे. सोबत कम्प्रेसर, पीसीबी, सेन्सर, मोटर्स आणि इलेक्ट्रिकल पार्ट्सवर 9 वर्षांच्या अतिरिक्त वॉरेन्टीसह 1 वर्षाच्या व्यापक वॉरेंटीदेखील दिली आहे.

दरम्यान, अमेझॉनवर घडलेला हा काही पहिलाच प्रकार नाही. प्राइम-डे 2019 मध्येही अॅमेझॉनने 9 लाख रुपयांचा कॅमेरा गियर 6500 रुपयांमध्ये विकला होता. कॅनन EF 800 लेन्स 99 टक्क्यांच्या सवलतीसह अवघ्या 6,500 रुपयांमध्ये विकला जात होता. त्यावेळीही ग्राहकांची अशीच चांदी झाली होती.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement