SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: एमपीएससीच्या रिक्त जागा ‘या’ तारखेपर्यंत भरण्यात येणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

एमपीएससीची परीक्षा (MPSC Exam) देणाऱ्या स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थ्यांचे प्रश्न समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलै 2021 प्रर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा आज सुरु झालेल्या अधिवेशनात केली आहे.

आज राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये एमपीएससीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरण्याची घोषणा केली.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..

आज एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर (Swapnil Lonkar) या उमेदवाराच्या आत्महत्येचा (Sucide) मुद्दा उपस्थित केला.अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये, अशी सरकारची भूमिका आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली,” असं अजित पवार म्हणाले.

Advertisement

“स्वप्निल लोणकर याने 2019 मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. परीक्षेचा निकाल 28 जुलै 2020 रोजी लागला. या परीक्षेत 3,671 उमेदवार पात्र ठरले. 1200 पदांकरिता ही परीक्षा पार पडली होती. एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत”, असं अजित पवार सभागृहात बोलताना सांगितलं.

स्वप्निलचे निधन हे अतिशय दुखद आहे. मुख्यमंत्रीही वेळोवेळी ही सगळी भरती प्रक्रिया करण्यासाठी आग्रही असतात. याआधी एमपीएससीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्वतः चर्चा केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे 5 मे 2021 चा अंतरीम आदेश, कोविडची (Covid-19) साथ यामुळे मधल्या काळ्यात प्रक्रिया होऊ शकली नाही, यावर मार्ग काढण्याची सरकारची भूमिका आहे. सरकार या संपुर्ण प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतील असेही अजित पवार म्हणाले.

Advertisement

स्वप्निलच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत?

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “आपल्या मनाला वाटेल तसा MPSC चा कारभार सुरु आहे. स्वप्नीलच्या मृत्यूनंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया या सभागृहात दाखवा, मग सरकारच्या डोळ्यात पाणी येईल. स्वप्नीलनंतर 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हे सरकार जर दगडाच्या हृदयाचं नसेल तर त्यांनी लोणकर कुटुंबाला 50 लाखांची मदत करावी”, अशी मागणी मुनगंटीवारांनी केली.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement