SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अनुष्का शर्मा झळकणार क्रिकेटरच्या भूमिकेत..! ‘या’ महिला क्रिकेटपटूवर येतोय ‘बायोपीक’, जाणून घेण्यासाठी वाचा..

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि कॅप्टन विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मा लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. यापूर्वी ‘सुलतान’ चित्रपटात अनुष्काने एका पहिलवानाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती एका महिला क्रिकेटरच्या भूमिकेत प्रेक्षकांना ‘क्लिन बोल्ड’ करणार आहे.

अनुष्का शर्मा सध्या विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये सुट्या एन्जॉय करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून ती चित्रपटांपासून दूर आहे. शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, आता ती लवकरच एका क्रिकेटरच्या रुपात मोठ्या पडद्यावर येणार आहे.

Advertisement

भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्यावर लवकरच एक बायोपीक येत आहे. त्यात अनुष्का शर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे. निळ्या जर्सीतील तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

झुलनच्या आयुष्यावर 2020 च्या सुरुवातीलाच ‘बायोपिक’ येणार असल्याची चर्चा होती. ‘ईडन गार्डन्स’ मैदानावरील शूटिंगचे काही फोटोही व्हायरल झाले. मात्र, नंतर या चित्रपटाविषयी फार चर्चा झाली नाही. आता पुन्हा एकदा अनुष्काचे निळ्या जर्सीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Advertisement

सध्या या बायोपिकच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. त्यामुळे 2021 अखेर चित्रपटाचे शुटींग सुरु होणार नाही. मात्र, 2022 च्या सुरुवातीला हे शूटिंग सुरु होऊ शकतं, असा अंदाज आहे. तसेच, अनुष्काही सध्या विराटबरोबर इंग्लंड दौऱ्यावर असल्याने शुटिंग लवकर सुरु होण्याची सूतराम शक्यता नाही.

झुलन गोस्वामी ‘चकदहा एक्सप्रेस’ नावाने ओळखली जाते. जगातील सगळ्यात वेगवान महिला गोलंदाजांपैकी ती एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 वर्षांपासून झुलन गोस्वामी खेळत आहे. महिला क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक विकेट मिळवणारी जगातील ती एकमेव गोलंदाज आहे.

Advertisement

क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत तिने 333 विकेट घेतल्या आहेत. त्यात झुलनने 180 वन-डेमध्ये 236, तर 11 कसोटीत 41 आणि 68 टी-ट्वेंटी सामन्यात 56 विकेट घेतल्या आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement