आमिर खानचे दुसरे लग्नही मोडले..! किरण रावसोबतचा 15 वर्षांचा संसार क्षणात उद्ध्वस्त, अशी सुरू झाली होती त्यांची प्रेमकहाणी..!
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप-पॅचअप या गोष्टी सुरूच असतात. कोणाचे तरी नाते सुरु होताना, कुणाचे तरी नाते तुटत असते. ब्रेकअपच्या या यादीत बाॅलिवुडमधील आणखी एका कपलचे नाव समोर आले आहे.
‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याने पत्नी किरण राव हिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. या जोडीचा 15 वर्षांचा संसार क्षणात मोडला. खरे तर आमिर खान याचा हा दुसरा विवाह होता. मात्र, त्याचा हा डावही अर्ध्यावरतीच मोडला..
किरण राव हिच्याआधी आमिर खान याचे रिना दत्ता हिच्याशी 1986 मध्ये लग्न झाले होते. मात्र, 2002 मध्ये त्याच्या आयुष्यात किरण राव हिची एन्ट्री झाली. त्यानंतर त्याने रिना दत्ता हिच्याशी काडीमोड घेतला होता.
रिना दत्ता हिच्यापासून वेगळ होताना आमिर खान याने तिला तब्बल 50 कोटी रुपये दिले होते. तोपर्यंतचा हा सगळ्यात महाग घटस्फोट ठरला होता. त्यानंतर त्याने किरण राव हिच्याशी रितसर विवाह केला. त्यांची केमिस्ट्रीही खूप चांगली जमली होती. बाॅलिवुडमधील हे एक फेव्हरेट कपल बनले होते.
तब्बल 15 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे दोघांनी जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली. मात्र, घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे समोर आलेले नाही.
दरम्यान, किरण राव व आमिर खान यांनी घटस्फोट झाला, तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. आता ते आयुष्याची नवी सुरुवात करणार आहोत. दोघे आता पती-पत्नीसारखे राहत नसलो, तरी मैत्री कायम राहील, असे आमिर खानने सांगितले आहे.
अशी सुरू झाली होती ‘लव्ह स्टोरी..’
‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट झाली होती. किरण राव ‘असिस्टंट डायरेक्टर’ म्हणून या चित्रपटात काम करीत होती. रीनाला (पहिली पत्नी) घटस्फोट दिला, तेव्हा किरण माझी मैत्रीणही नव्हती, असे आमिरने सांगितलं होतं.
किरणच्या करिअरची सुरुवातही ‘लगान’पासूनच झाली होती. त्यानंतर तिने आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेस’साठीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. शिवाय ‘दिल चाहता है’ या सिनेमात ‘कॅमिओ’ रोलही तिने केला होता.
किरण एक बुद्धिमान दिग्दर्शिका आहे. तिच्या बुद्धिमतेवरच भाळल्याचे आमिरने कबूल केले होते. रिनासोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिर मानसिक तणावात होता. त्यावेळी किरणने त्याला फोन केला. दोघेही फोनवर किमान अर्धा तास बोलत होते.
किरणच्या बोलण्यावर प्रभावित होऊन आमिरने तिला डेट करण्यास सुरुवात केली. दोन वर्षे दोघे एकमेकांना भेटत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2005 मध्ये या दोघांचं लग्न झालं.
किरण राव ही शाही कुटुंबातील मुलगी आहे. तिचे आजोबा तेलंगणा राज्यातील वानापार्थीचे राजा होते. किरण राव ही आदिती राव हैदरीची बहीण आहे.