भारतीयांसाठी एक अतिशय आनंदाची, अभिमानाची बातमी आहे. अंतराळ परी कल्पना चावला हिच्यानंतर आणखी एक भारतीय वंशाची महिला अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
सिरिशा बांदला, असे या भारताच्या दुसऱ्या अंतराळ परीचे नाव आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूंर जिल्ह्यातील एका खेडेगावात सिरिशाचा जन्म झाला. इंडियानाच्या पर्ड्यू विश्र्वविद्यापीठातून तिने पदवी घेतली. नंतर टेक्सासमधील ह्यूस्टन येथून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. 34 वर्षीय सिरिशा एक ॲरोनॉटिकल इंजिनिअर आहे.
सिरिशाचे आजोबाही बांदला रगहिया हे कृषी वैज्ञानिक असून, नातीच्या यशाचा अभिमान वाटत असल्याचे त्यांना सांगितले. तसेच तिचे वडिल मुरलीधर हेही वैज्ञानिक असून, अमेरिकन सरकारमध्ये ते सिनिअर एक्झिक्युटिव्ह आहेत.
अमेरिकन अंतराळ कंपनी ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’चे रिचर्ड ब्रेनसन आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत अंतराळात झेपावणार आहेत. या सहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश असून, त्यात सिरिशा बांदला या भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.
I am so incredibly honored to be a part of the amazing crew of #Unity22, and to be a part of a company whose mission is to make space available to all. https://t.co/sPrYy1styc
— Sirisha Bandla (@SirishaBandla) July 2, 2021
Advertisement
न्यू मॅक्सिको येथून येत्या 11 जुलै रोजी हे सहा शास्त्रज्ञ अंतराळात उड्डाण करणार आहेत. आपली सिरिशा अंतराळात संशोधन विभागात काम करणार आहे.
कल्पना चावला हिच्यानंतर अंतराळात झेप घेणारी सिरिशा दुसरी भारतीय महिला ठरणार आहे. याबाबतची माहिती स्वत: सिरिशाने सोशल मीडियातून शेअर केली. आपल्या ट्विटमध्ये सिरिशाने म्हटलं आहे, की “युनिटी 22 क्रू कंपनीचा एक भाग होणार असल्याचा मला अत्यंत अभिमान वाटत आहे.