SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ईडीची वक्रदृष्टी बॉलिवूडवर..! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला समन्स बजावले, चौकशीला टाळाटाळ केल्यास अटक होणार..?

सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate), अर्थात ईडीची पीडा मागे लागली, की भल्याभल्यांची गाळण उडते. आतापर्यंत राजकीय नेत्यांमागे हात धुवून लागलेल्या ईडीची वक्रदृष्टी आता बाॅलिवूडवर पडली आहे. बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला ईडीकडून समन्स बजावण्यात आलेय.

या बाॅलिवूड अभिनेत्रीचे नाव आहे, यामी गौतम..! ‘फेमा’ (FEMA) कायद्याअंतर्गत ईडीने यामीला हे समन्स बजावले आहे. ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप यामी गौतम हिच्यावर आहे. जबाब नोंदविण्यासाठी ईडीने पुढील आठवड्यात तिला कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

Advertisement

‘फेमा’ हा परकीय चलनासंबंधित कायदा आहे. परदेशातून मागविलेल्या वस्तू-सेवांबाबत करण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवली जाते. त्यात काही गडबड वा शंका आढळल्यास कारवाई केली जाते. त्यात दोषी आढळल्यास ‘फेमा’ कायद्यानुसार व्यवहार झालेली मालमत्ता जप्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

यामी गौतमला ईडीने दुसऱ्यांदा हे समन्स बजावलं आहे. गेल्या वर्षीही ईडीने यामीला समन्स बजावले होते. मात्र, लॉकडाउनचे कारण देत तिने चौकशी टाळली होती.

Advertisement

अटकही केली जाण्याची शक्यता
‘फेमा’ कायद्याअंतर्गत तिची चौकशी केली जाणार आहे. यामीनं काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे. मात्र, कुठल्या व्यवहारात तिने हा गैरप्रकार केलाय, हे समजू शकले नाही. यावेळी जर ती ईडीच्या चौकशीसाठी हजर राहिली नाही, तर तिला अटकही केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, ‘विकी डोनर’ चित्रपटातून यामीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत तिने ‘काबिल’, ‘बदलापूर’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ अशा चित्रपटांमधून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत 4 जून रोजी यामीने गुपचूप लग्नगाठ बांधली होती.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement