हे भारी आहे! भंगारवाला ‘असा’ बनला करोडपती, मोडीत काढलेले 6 हेलिकॉप्टर्स भंगार म्हणून घेतले विकत
आपल्या देशात भंगरवले असा आवाज ऐकणं आता तसं कमी झालं आहे. काही वर्षांपूर्वी या आवाजामुळे लहान मुलं खुश व्हायची, कारण तुम्हाला माहीत असेलच ! गावोगावी फेऱ्या मारून भंगार गोळा करणारे हे भंगारवाले आपलं रोजचं काम करून पोट भरतात. ज्या भंगारवाल्यांना आपण बघतो ते विविध गावात फिरून भंगार गोळा करतात.
तुम्हाला माहीती आहे का?
एक भंगारवाला करोडपती झाला आहे. भंगारवाले पैसे कमवतात, पण इतके जास्त पैसे कसं काय कमवू शकतात किंवा भंगारवाले कसं काय लखपती, करोडपती होऊ शकतात, असं तुम्हाला वाटेल. तर पंजाबमधील मनसा जिल्ह्यातील मीटू नावाच्या भंगारवाल्याने वायुदलाची तब्बल 6 हेलिकॉप्टर्स ( 6 Helicopters) विकत घेतली आहेत. त्यातून त्याने लाखों रुपये कमावले आहेत.
भंगारवाल्याने नेमकं केलं काय?
झालं असं की, भारतीय वायू दलाने (Indian Air Force) 6 हेलिकॉप्टर्स मोडीत काढली होती. ही 6 हेलिकॉप्टर्स ऑनलाईन टेंडर द्वारे भंगारात काढली गेल्याचं समजलं.
मग मिठू या भंगारवाल्याचा मुलगा डिंपल याने त्यांना विचारले की, वायुदलाने काही हेलिकॉप्टर्स मोडीत काढली आहेत, आपण ती मोडीत घेऊया का? मग काय मिठू यांनी परवानगी दिल्यानंतर लगेच त्यांनी ही विमाने हेलिकॉप्टर्स विकत घेतली.
त्यांनी सांगितलं की, जेव्हा ते त्यांच्या दुकानात ही हेलिकॉप्टर्स घेऊन आले तेव्हा त्यांना संपूर्ण परिसर मोकळा करावा लागला. मिटू हे 1988 पासून भंगारचे काम करतात.
आता मिठू यांचा मुलगा देखील भंगारच्या व्यवसायात आला आहे. त्यांचा मुलगा म्हणतो आम्हाला अभिमान आहे. आम्ही घेतलेले हे हेलिकॉप्टर्स पाहण्यासाठी लोक रोज येतात, त्या सोबत सेल्फी काढतात. आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो. मिठू आणि त्यांचा मुलगा देशभरातील सरकारी आणि इतर भंगार विकत घेतात.
त्यांनी माहीती देताना म्हटलं आहे की, ही सर्व हेलिकॉप्टर्स उत्तर प्रदेशातील सरसावा एअरबेसवरून विकत घेतली आहेत. एकूण 6 विकत हेलिकॉप्टर्स त्यांनी विकत घेतली होती आणि मग त्यातील 3 हेलिकॉप्टर्स त्यांनी तिथंच विकली आणि बाकी उरलेली ते सरसावा येथे घेऊन गेले.
जे 3 हेलिकॉप्टर्स त्यांनी विकले त्यातील एक चंदीगड येथील एका रिसॉर्टवर शोभेसाठी ठेवले. दुसरे लुधियाना येथे पाठविले तिसरा एका शूटिंग कंपनीने मुंबईला पाठविले जाणार आहे. त्यांनी यातून लाखो रुपये कमावले आहेत, असं म्हटलं आहे.