SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी: अजित पवारांच्या नातेवाईकांचा कारखाना ईडीकडून जप्त!

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता.

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण:

Advertisement

राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

Jarandeshwar Sugar Mills Private Ltd हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात चिमणगाव येथे असलेला हा कारखाना 2010 मध्ये जेव्हा खरेदी करण्यात आला होता तेव्हा त्याचे मूल्य 65.75 कोटी रुपये इतके हाेते.

Advertisement

पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना व मशिनरी जप्त करण्यात आली आहे, तर अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने (ED) केला आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत, प्लांट आणि मशिनरी ॲटॅच करण्यात आली आहे. या प्रॉपर्टी गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे आहेत.

Advertisement

ED च्या मते, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे जरंडेश्वर एसएसकेचे प्रॉक्सी मालक आहेत आणि वास्तविक नियंत्रण स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (डीसीसीबी), ज्यामध्ये अजित पवार संचालक होते, त्यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला 100 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्यानंतर पुढील काही वर्षांत पुणे डीसीसीबीने (व इतर) जरंडेश्वर एसएसकेला 600 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज मंजूर केले होते..

तपासामध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे (Sparkling Soil Pvt Ltd) या कारखान्याचे सर्वांत जास्त शेअर्स आहेत, असं ईडीने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.

Advertisement

हा कारखाना विकत घेण्यासाठीचे पैसे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित स्पार्कलिंग सॅाईल कंपनीतने दिल्याचं ईडीचं म्हणणं आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता.

जरंडेश्वर कारखान्याचा प्रवास:

Advertisement

▪️ 21 नोव्हेंबर 1989 साली नोंदणी
▪️ 1999 मध्ये पहिला गळीत हंगाम
▪️ 2005 पर्यंत कारखाना शालिनीताई पाटील यांच्याकडे
▪️ 2005 नंतर 2010 पर्यंत कारखाना भाडेतत्वावर
▪️ जून 2010 मध्ये राज्य बँकेने कारखाना ताब्यात घेतला, ऑगस्ट 2010 मध्ये नोटीस काढली आणि डिसेंबर 2010 मध्ये लिलाव केला.

राज्य सहकारी बँक घोटाळा: राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. तसंच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केले. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानेच ईडीने आपला गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement