SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर, तर दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होणार..?

बारावीतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. राज्याच्या शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. त्यानुसार बारावीच्या निकालासाठी ‘सीबीएसई’ पॅटर्नचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. राज्य सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के, तर बारावीसाठी 40 टक्के, अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे असे होणार मूल्यमापन..

Advertisement

दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत..?

Advertisement

दरम्यान, दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे. मुंबई विभागीय मंडळासह राज्यातील 96 टक्के शाळांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत 100 टक्के काम पूर्ण होण्याची आशा आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास 15 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.

राज्यात 96 टक्के, तर मुंबई विभागातील 93 टक्के शाळांचे अंतर्गत मूल्यमापन 1 जुलैपर्यंत पूर्ण झाले होते. राज्य शिक्षण मंडळाने 30 जूनपर्यंत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण अपलोड करण्यासाठी मुदत दिली होती.

Advertisement

काही तांत्रिक अडचणींमुळे काही शाळा हे गुण अपलोड करू शकल्या नाहीत. अशा शाळांना गुण अपलोड करण्यासाठी आता मुदतवाढ दिली जाणार आहे. सर्व शाळांचे गुण अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 15 ते 20 जुलैदरम्यान दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement