SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘भारतनेट’ योजनेंतर्गत आता गावं बनणार स्मार्ट, गावागावांमध्ये पोहोचणार इंटरनेट, ‘या’ आणि इतर मंजूर योजनेविषयी जाणून घ्या..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वात बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 6.28 लाख कोटींच्या मदत पॅकेजला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.

यावेळी 16 राज्यांतील 3 लाख 61 हजार गावांमध्ये इंटरनेट ब्रॉडबॅण्डची सुविधा पोहोचवण्यासाठी 19 हजार कोटी तर, वीज वितरण क्षेत्रातील सुधारणांसाठी 3 लाख कोटींच्या खर्चाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याशिवाय, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अन्य योजनांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

Advertisement

भारतनेटसाठी सरकारकडून 19 हजार कोटी रुपये: मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने भारतनेटला (BharatNet Project) मंजुरी दिली आहे. हा देशातील 16 राज्यांमधील एकूण 3.60 लाख पंचायतींना ब्रॉडबँडने (Broadband) जोडण्यासाठी 29 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. भारत सरकारचा यासाठी खर्च झालेल्या एकूण रकमेमध्ये वाटा 19,041 कोटी रुपये आहे.

वीज ऊर्जा क्षेत्रासाठी 3.03 लाख कोटींना मंजुरी: वीज वितरण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्राने (Central Government) राज्यांना आराखडा तयार करावयाचे सांगितले आहे. याप्रमाणे राज्य सरकारांकडून आराखडा मागवला जाऊन त्यांना केंद्रामार्फत पैसे देण्यात येणार आहेत. वीज ऊर्जा क्षेत्रासाठी 3.03 लाख कोटींना मंजुरी देण्यात आली आहे. मोठ-मोठ्या शहरांमध्ये स्वयंचलित बिलिंग सिस्टम लागू करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सौर ऊर्जा यंत्रणेचा विस्तार करणे आदी सुधारणा केल्या जाणार आहेत.

Advertisement

नोव्हेंबर 2021 पर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य: कॅबिनेटने मोफत रेशनच्या प्रकल्पाही मंजुरी दिली आहे. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांनाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गरीब कल्याण धान्य योजनेला (The Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनीच दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्याअंतर्गत नोव्हेंबर 2021 पर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन देण्यात येईल. त्यासाठी आता 93 हजार कोटींचा निधी मंजूर केला गेला आहे”, असं ते म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement