SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 1 जुलै 2021

मेष (Aries) : जवळचा प्रवास मजेत पार पडेल. निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. फार हट्टीपणा करू नका.

Advertisement

वृषभ (Taurus) : मनातील व्याकूळता बाजूला सारावी लागेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराशी क्षुल्लक खटके उडण्याची शक्यता.

मिथुन (Gemini) : शारीरिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन कामात घाई करून चालणार नाही. नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. प्रवास जपून करावेत.

Advertisement

कर्क (Cancer): आपले उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. भागीदारीत चर्चेला महत्व द्यावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. कामातून अपेक्षित समाधान लाभेल.

सिंह (Leo) : भागिदारीतून चांगली कमाई होईल. भावंडांना मदत करावी लागेल. क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका. नवीन कामात सतर्कता बाळगा.

Advertisement

कन्या (Virgo) : मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. नसते साहस अंगाशी येऊ शकते. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल.

तूळ (Libra) : काही समस्यांतून वेळीच मार्ग निघेल. खोलवर चिंतनाची गरज भासू शकते. हातातील मिळकतीवर अधिक लक्ष केंद्रीत करावे.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : आंतरिक इच्छा पूर्ण होतील. काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. काही कामात अधिक ऊर्जा वापरावी लागेल.

धनु (Sagittarius) : कायद्याचे नियम डावलून चालणार नाही. स्त्री सौख्यात भर पडेल. क्षणिक आनंदात न्हाहून निघाल. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.

Advertisement

मकर (Capricorn) : हाती घेतलेले नवीन काम पूर्ण होईल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. मुलांवरील खर्च वाढू शकतो.

कुंभ (Aquarius) : आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. चविष्ट पदार्थ खायला मिळतील. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल.

Advertisement

मीन (Pisces) : मानसिक आरोग्य उत्तम राहील. नवीन योजनांना खतपाणी घालावे. कमिशन मधून चांगला मोबदला मिळेल. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement