SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अशी झाली होती गुलशन कुमार यांची हत्या..! बांग्लादेशात पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न कसा फसला, जाणून घेण्यासाठी वाचा..

टी सिरीज कंपनीचे मालक, तथा ‘कॅसेटकिंग’ गुलशन कुमार यांची 1997 मध्ये गोळ्या झाडून हत्या झाली. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याला विशेष मोक्का कोर्टाने २००२ मध्ये दिलेली जन्मठेपेची शिक्षा आज (ता.1) मुंबई हायकोर्टानेही कायम ठेवली.

गुलशन कुमार हत्याकांडातील १९ पैकी १८ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यात ‘टीप्स’ कंपनीचे मालक रमेश तौरानी यांचाही समावेश होता. विशेष मोक्का कोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकारने केलेले अपील फेटाळून लावताना मुंबई हायकोर्टाने तौरानी यांनाही दिलासा दिला.

Advertisement

मात्र, या प्रकरणातील आणखी एक निर्दोष सोडलेला आरोपी अब्दुल रशीद दाऊद मर्चंट (प्रमुख आरोपी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याचा भाऊ) याला मात्र शिक्षा सुनावली. त्याला तात्काळ सेशन्स कोर्टात किंवा अंधेरीमधील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात शरण जाण्याचा आदेश दिला आहे.

आरोपीचा बांग्लादेशात पळून जाण्याचा प्रयत्न

Advertisement

या प्रकरणातील प्रमुख आरोपी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याला कुटुंबीयांना भेटण्यासाठी एप्रिल २००९ मध्ये फर्लो रजेवर सोडले होते. त्याचा गैरफायदा घेऊन तो बांग्लादेशमध्ये पळून गेला. सीमा भागात घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली बांग्लादेशातील पोलिसांनी त्याला अटक केली. तेथील कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. ती शिक्षा पूर्ण झाल्यावर नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याला पुन्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते.

असे झाले होते हत्याकांड..

Advertisement

गुलशन कुमार वैष्णोदेवीचे मोठे भक्त होते. त्याशिवाय ते रोज भल्या सकाळीच पश्चिम मुंबईतील अंधेरीतील जीतेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जात. नेहमीप्रमाणे 12 ऑगस्ट 1997 रोजी भल्या सकाळी आठ वाजता ते पूजा करण्यासाठी मंदिरात गेले होते.

पूजा आटोपून सकाळी साडे दहा वाजता ते मंदिराबाहेर आले. त्याच वेळी कोणीतरी त्यांच्या पाठीवर बंदूक ठेवली. समोरून आणखी एक बंदुकधारी आला. गुलशन कुमार यांनी त्यांना ‘हे काय करताय..’ अशी विचारणा केली.

Advertisement

आता वर जाऊन पूजा कर..

त्यावर एका हल्लेखाेराने “खूप झाली पूजा.. आता वर जाऊन पूजा कर..!’ असे म्हणत अंधाधुंद गोळीबार सुरू केला. गुलशन कुमार यांच्यावर 16 गोळ्या झाडण्यात आल्या. बचावासाठी गुलशन कुमार यांनी तेथील अनेक घरांचे दरवाजे ठोठावले; पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

10 कोटींच्या खंडणीसाठी हत्या

डाॅन दाऊद ईब्राहिमने गुलशन कुमार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितली होती. मात्र, ती देण्यास गुलशन कुमार यांनी नकार दिला होता. त्यामुळे अबु सालेम याच्या सांगण्यावरून शार्पशूटर दाऊद मर्चेंट आणि विनोद जगताप यांनी गुलशन कुमार यांची हत्या केल्याचे तपासात समाेर आले.

Advertisement

संगीतकार नदीम श्रवण यांच्यावरही आरोप

संगीतकार नदीम श्रवण यांच्यावरही गुलशन कुमार यांच्या हत्येचा आरोप झाला होता. घटनेच्या वेळी ते लंडनमध्ये होते. हत्याकांडात नाव येत असल्याचे पाहून ते भारतात परतलेच नाही. मात्र, नंतर पोलिसही त्यांना याप्रकरणात आरोपी साबीत करू शकले नाही.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement