SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 30 जून 2021

मेष (Aries) : मनावरील ताण दूर सारावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. सामाजिक जाणि‍वेतून काम कराल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.

Advertisement

वृषभ (Taurus) : दुराग्रहीपणे निर्णय घेऊ नका. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घरासाठी काही

मिथुन (Gemini) : कामात उगाचच खो बसल्यासारखा वाटू शकतो. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात.

Advertisement

कर्क (Cancer): मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकते. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा.

सिंह (Leo) : किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात.

Advertisement

कन्या (Virgo) : मनोरंजनातून आनंद घ्याल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

तूळ (Libra) : मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल.

धनु (Sagittarius) : कौटुंबिक रूसवे-फुगवे दूर करावे लागतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील.

Advertisement

मकर (Capricorn) : उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावा लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल.

कुंभ (Aquarius) : अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

Advertisement

मीन (Pisces) : मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement