SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ट्रॅफिकचे ‘नो टेन्शन’..! आता आलीय हवेत उडणारी कार.. फिचर पाहून तोंडात बोटे घालाल..!

ट्रफिक जॅमचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानेच कधी ना कधी घेतला असेल. वाहतूक कोंडीत अडकल्यावर जीव नकोसा होतो. मग कधी कधी असं वाटतं, की आपल्यालाच हवेत उडता येत असतं, तर किती बरं झालं असतं.. पण आता लवकरच तुमचे हे स्वप्न साकार होणार आहे..

चिमुकल्यांचे आवडते कार्टून ‘मोटू-पतलू’मध्ये आपण हवेत उडणारी कार पाहिली असेल; अगदी तशीच कार वास्तवात उडताना दिसू शकेल. विमानाप्रमाणे कारही हवेत उडावी, ही काही अतिशयोक्ती राहिलेली नाही. कारण, आता तुम्हाला खरोखरच कार हवेत उडताना दिसणार आहे. माणसाचे कार हवेत उडविण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे.

Advertisement

हवेत उडणाऱ्या पहिल्या-वहिल्या कारची 35 मिनिटांची चाचणी युरोपमधील स्लोवाकियातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच पार पडली. एअर क्राप्ट आणि कार यांचे हे हायब्रिड उत्पादन आहे. या कारला बीएमडब्लूचे इंजिन असून, ती पेट्रोलवरही चालू शकणार आहे.

Advertisement

युरोपमधील प्रा. स्टिफन क्लिन यांनी या कारची निर्मिती केली आहे. 8200 फूट उंचीवर या कारची उडण्याची क्षमता आहे. जवळपास एक हजार किलोमीटरचे अंतर ती सहज पार करू शकते. सतत 40 मिनिटे ही कार हवेत राहू शकते. अवघ्या सव्वा दोन मिनिटांत या कारचे रुपांतर हवेत उडणाऱ्या कारमध्ये होणार आहे.

कारमधून एकावेळी दोन जणांना प्रवास करता येणार आहे. जवळपास 200 किलो वजन कार पेलू शकते. ती 170 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने ही कार उडू शकणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

 

Advertisement