SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावीनंतरच्या पॉलिटेक्निकसाठी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू, ‘असं’ आहे वेळापत्रक..

इयत्ता दहावीनंतरच्या पदविका (Polytechnic) अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेश प्रक्रिया (Admission Process) आज बुधवारपासून (30/06/2021) सुरू होत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येत असतो. यावर्षी दहावीचा निकाल ‘अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे’ लागणार आहे आणि यावर्षीच्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक वेबसाईटवर पाहता येणार :

▪️ पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारी (आज) सुरुवात होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सायंकाळी ट्विट करून जाहीर केले आहे.

Advertisement

▪️ दहावी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष 2021 -22 करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक 30 जून 2021 पासून सुरू होत आहे.

▪️ या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी https://poly21.dtemaharashtra.gov.in/diploma21/ या संकेतस्थळाला भेट द्या, असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Advertisement

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत इयत्ता दहावीनंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया यापुर्वीच सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेण्यासाठी अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला होता, अशीही माहीती आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement