SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

समुद्राचे पाणी गोड करणार..! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, पाहा कुणाला होणार या पाण्याचा लाभ..?

मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्क समुद्राचे पाणी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी खास इस्रायली तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका व आय. डी. ई.  वॉटर टेक्नॉलॉजीज् लि. यांच्यात सोमवारी (ता.28) मालाड, मनोरी येथील 200 दशलक्ष लिटर पाण्याचे नि:क्षारीकरण प्रकल्प अहवालाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे आता या प्रकल्पाला वेग मिळण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

मुंबईतील इस्रायलच्या दूतावासानंही त्याची दखल घेत, खास मराठीतून ‘ट्विट’ करताना मुख्यमंत्री ठाकरे यांचे विशेष अभिनंदन केले.

या ट्विटमध्ये म्हटलेय, की “पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन..! जलतंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल महाराष्ट्रासोबत आहे..”

Advertisement

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या सामंजस्य कराराच्या वेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की “मुंबईकरांना २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मात्र, त्यासाठी किती धरणे बांधणार, किती झाडे तोडून जमिनीचे वाळवंट करणार..?”

Advertisement

पाण्याची गरज भागविण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मुर्त स्वरुप येत आहे. या प्रकल्पातून २०२५ पासून मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

असा असणार प्रकल्प..

Advertisement

मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता तुलनात्मकदृष्ट्या चांगली आहे. हे ठिकाण कांदळवन विरहित आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रापासून दूर आहे.

करार झाल्यानंतर 10 महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त होईल. प्रकल्प अहवाल तयार करताना समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण, भुपृष्ठीय भुभौतिकशास्त्रीय सर्वेक्षण, पर्यावरण निर्धारण अभ्यास (सागरी व जमीनीवरील) आदी कामे केली जाणार आहेत.

Advertisement

मे २०२२ पर्यंत डीपीआर, तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरू होणार असून, मुंबईकरांना मिळणार २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळू शकेल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement