SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 28 जून 2021

मेष (Aries) : दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. आवडत्या कलेचा आनंद घ्याल.

Advertisement

वृषभ (Taurus) : भावंडांची जबाबदारी अंगावर पडेल. अती कामामुळे बौद्धिक ताण जाणवेल. गोष्टी एकाच जागी खिळून पडल्यासारख्या वाटतील. क्षणिक मोहाला बळी पडू नका.

मिथुन (Gemini) : काही आवड पूर्ण कराल. आळस झटकून कामे करावी लागतील. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

Advertisement

कर्क (Cancer): जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे लागेल.

सिंह (Leo) : क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आर्थिक गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध रहा.

Advertisement

कन्या (Virgo) : नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. मानसिक चंचलता दूर करावी.

तूळ (Libra) : शेअर्स मधून चांगला लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल. मानापमानाच्या प्रसंगांनी डगमगू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी.

धनु (Sagittarius) : जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत. शांत व संयमी विचार करावा. आपली संगत एकवार तपासून पहावी.

Advertisement

मकर (Capricorn) : जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. घरगुती कामात दिवसभर गुंतून पडाल. काही खर्च अचानक सामोरे येतील.

कुंभ (Aquarius) : जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघांना प्रेमाने आपलेसे कराल. व्यावसायिक लाभाने सुखावून जाल.

Advertisement

मीन (Pisces) : क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement