‘प्रियकराला भेटू द्या..!’ पाकिस्तानी तरुणीचं थेट पंतप्रधान माेदींना साकडे, पाहा माेदींनी काय उत्तर दिलेय..?
प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं, असं म्हटलं जातं. प्रेमाला कसलं आलंय बंधन..? आपल्या प्रिय व्यक्तीसाठी माणसं जात-धर्मच काय.. देशाच्या सीमाही ओलांडण्यास तयार होतात.
असंच एक प्रेमप्रकरण नुकतंच समोर आलं. ती पाकिस्तानची, तर तो भारताचा.. दोघंही उच्चशिक्षित. ‘फेसबूक’वर भेटले.. हळूहळू मैत्री नि त्यांचं रुपांतर प्रेमात झालं. आता या दोघांनाही लग्नगाठ बांधायचीय; पण…
भारतात 2020 पासूनच कोरोनाचा प्रसार वाढला. परिणामी, भारत व पाकिस्तान दरम्यान प्रवासासाठी सध्या पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यात भारत-पाकमधील संबंध नेहमीच ताणलेले.. त्यामुळे तिला भारतात प्रवेश करण्यात अडचणी येत आहेत.
सुमन रंतीलाल, असे या तरुणीचे नाव आहे. पाकिस्तानातील कराची येथे राहते. ती एक शिक्षिका असून, सध्या एम. फिल (M.Phil)चा अभ्यास करतेय. सुमनचा बॉयफ्रेंड पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील श्री हरगोबिंदपूर येथे राहतो. अमित असं त्याचं नाव आहे.
2019 मध्ये सुमन व अमित ‘फेसबूक’वर भेटले आणि नंतर दोघेही प्रेमाच्या बंधनात बांधले गेले. आता त्यांना एक व्हायचं आहे. त्यासाठी काहीही करायची सुमनची तयारी आहे. अगदी आपला देश सोडण्याचीही..!
पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी सुमनने भारतीय उच्चायोगात ट्रॅव्हल व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रेही जमा केली आहेत. मात्र, कोरोनाच्या प्रकोपामुळे अद्याप तिला व्हिसा मिळालेला नाही.
प्रियकराच्या भेटीसाठी आतूर झालेल्या सुमनने बॉर्डर क्रॉस करण्यासाठी अखेर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले. प्रियकरासोबत लग्नाची गाठ बांधण्यासाठी भारताचा व्हिसा देण्याचा मागणी सुमनने माेदी सरकारकडे केली आहे. आता मोदी सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews