हिरो इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करा, ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंटसह ऑफर, किंमत तुम्हीच पाहा किती झाली कमी..
पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले भाव पाहून ग्राहकांनी इलेक्ट्रिक स्कुटरकडे आपला कल हळूहळू वळविला आहेत. आता इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढत आहे.
इलेक्ट्रिक दुचाकींच्या खरेदीला चालना देण्यासाठी सरकारने फेम II च्या (FAME II) अनुदानातही बदल केला आहे. त्यानंतर सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी हजारो रुपयांनी किंमती कमी केल्या आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे हिरो इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरच्या किंमतीतही 12 ते 33 टक्क्यांनी कपात केली आहे. यात सर्वाधिक फायदा ट्रिपल बॅटरीसह येणाऱ्या Nyx HX स्कूटरमध्ये दिला जात आहे.
जाणून घेऊया आकर्षक ऑफर्ससहित Hero Electric च्या इलेक्ट्रिक स्कुटर्स:
1) Hero Electric च्या Photon HX नावाच्या स्कूटरची किंमत 8,491 रुपयांनी खाली आली आहे.एवढी मोठी किंमत कमी होऊन ही स्कूटर आता तुम्ही 71,449 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. याआधी या स्कूटरची किंमत 79,940 रुपये एवढी होती.
2) Hero Electric च्या Optima HX या सिंगल बॅटरी असणाऱ्या स्कूटरची किंमत 61,640 रुपये इतकी आहे, जी आता 53,600 रुपये इतकी झाली आहे.
3) तुम्ही ऑप्टिमा ईआर (Optima ER) डबल बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटर 58,980 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. पूर्वी त्याची किंमत 78,640 रुपये इतकी होती. स्कूटरच्या किंमतीत कंपनीने तब्बल 19,660 रुपयांची कपात केली आहे.
4) लोकांची आवड पाहता यासोबतच Nyx E5 सिंगल बॅटरी असणारी इलेक्ट्रिक स्कूटर 61,000 रुपयांतच खरेदी करू शकता. याआधी या स्कूटरची किंमत 68,640 रुपये होती.
5) Nyx ER डबल बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटर यापूर्वी असणाऱ्या 83,940 रुपयांच्या किमतीच्या तुलनेत 62,954 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकते.
6) तुम्ही Hero ची Nyx HX ट्रिपल बॅटरी असणारी इलेक्ट्रिक स्कूटर 85,136 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्कूटरची किंमत थोडे-थिडके नव्हे तर 27,979 रुपयांनी कमी झाली असून, यापूर्वी किंमत 1,13,115 रुपये एवढी होती.
हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) सोडून दुसऱ्याही कंपन्या आहेत. ज्या इलेक्ट्रिक वाहनांवर ऑफर देत आहेत, ज्यात Ather, Revolt Motors या कंपन्यांचा समावेश आहे.
महत्वाचं! सदर किंमतीत ठिकाणांनुसार वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी कमी-अधिक बदल असू शकतो. म्हणून आपण इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करताना अचूक किंमत शोरूमला भेट देऊन माहीत करून घ्यावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews