SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियातील ‘या’ खेळाडूंवर टांगती तलवार..! काहींची कारकीर्द पणाला, पाहा कोणा-कोणाची गच्छंती होणार..?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे टीम इंडीयात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

इंग्लंडविरुद्ध ऑगस्टमध्ये 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. पुढच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील ही भारताची पहिलीच सीरिज असेल. मागील 8 वर्षात आयसीसी स्पर्धा जिंकण्यात टीम इंडीयाला अपयश आल्याने बीसीसीआय आता मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

विशेषत: टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. त्याची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजपासूनच होणार असल्याचे बोलले जाते. त्यापैकी काही खेळांडूना तर अखेरची संधी असल्याचे समजले.

चेतेश्वर पुजारा : प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू राहुल द्रवीड याच्यानंतर टीम इंडियाची ‘अभेद्य भिंत’ म्हणून चेतेश्वर पुजाराने ओळख निर्माण केली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पुजारा खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्या स्ट्राईक रेटवरही सातत्याने टीका होत असते.

Advertisement

विराट कोहलीनेही फायनलमधील पराभवानंतर अप्रत्यक्षपणे पुजारावरच निशाणा साधला होता. त्यामुळे पुजाराचे टीममधलं स्थान धोक्यात आले आहे. त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता आहे.

रवींद्र जडेजा : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रवींद्र जडेजाने आॅलराऊंडरची भूमिका बजावली; पण त्यात त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे टीम इंडिया आता ऑलराऊंडर म्हणून शार्दुल ठाकूर याला खेळविण्याचा विचार करीत आहे.

Advertisement

इंग्लंडच्या वातावरणात शार्दुल चांगल्या प्रकारे बॉल स्विंग करू शकतो. शिवाय त्याची बॅटिंगही उपयोगी ठरू शकते. ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दूलने आपल्या बॅटिंगची चुणूक दाखवली होती.

इशांत शर्मा : भारताने फायनलमध्ये मोहम्मद शमी, इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह यांना खेळविले; पण शमी सोडता सगळ्याच बाॅलर्सनी निराशा केली. त्यामुळे आता टीममध्ये मोहम्मद सिराजला संधी मिळणार असल्याचे बाेलले जाते.

Advertisement

मोहम्मद सिराजला खेळवायचं झाल्यास इशांत शर्माला बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्यात भारताच्या ऐतिहासिक विजयात सिराजने मोलाची भूमिका बजावली होती. टेस्ट सीरिजमध्ये सिराज भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरला होता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement