जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी मोठी बातमी आली आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता असल्याने आगामी ‘आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप’ यूएईमध्ये (UAE) खेळविण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग थेट खेळाडूंना झाल्याने ‘आयपीएल’चा 14 वा हंगाम मध्येच थांबवण्यात आला होता. नंतर ‘आयपीएल’चे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळविण्याचा निर्णय झाला.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची तिसरी लाट भारतात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने ‘टी-ट्वेन्टी’ स्पर्धेसाठीही दुसऱ्या ठिकाणांचा शोध सुरू होता.
अखेर टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धाही यूएईमध्ये खेळविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, 17 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, अंतिम सामना 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ‘एएनआय’ने ट्विटद्वारे ही माहिती दिली. मात्र, याबाबत अजून ‘आयसीसी’ने अधिकृत घोषणा केलेली नाही.
असे असेल शेड्यूल..!
पहिल्या फेरीत 8 संघांमध्ये (बांगलादेश, आर्यलंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी) 12 सामने होतील. त्यातील चार संघ ‘सुपर-12’साठी क्वालिफाय करतील. नंतर 12 संघात 30 सामने होतील. हे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होतील.
‘सुपर 12’ संघ दोन गटात विभागले जातील. सर्व सामने दुबई अबूधाबी आणि शारजा येथे होणार आहेत. नंतर तीन नॉक आऊट, दोन सेमी फायनल आणि एक फायनल, असे सामने होणार आहेत.!