SpreadIt News | Digital Newspaper

‘दी फॅमिली मॅन’मधील ‘जेके’ कर्जात बुडाला होता, आठवणींना उजाळा देताना शारीब हाश्मी झाला भावूक.. पाहा तो काय म्हणाला..?

कुटुंब आणि कामाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘स्पेशल एजंट’चा प्रवास आपण ‘दी फॅमिली मॅन’ या वेबसीरीज पाहिला. प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याचा कसदार अभिनय आणि त्याला सहकाऱ्यांची मिळालेली साथ, या मुळे ही सीरीज सुपरहिट ठरली.

मनोज वाजपेयीसोबतच या सीरीजमध्ये आणखी एका अभिनेत्याने लक्ष वेधून घेतले, तो म्हणजे शारीब हाश्मी, अर्थात आपला जे. के. तळपदे. या सीरीजमुळे आज शारीब हाश्मी यशाेशिखरावर पोचला आहे.

Advertisement

एक काळ असाही होता, की हा शारीब हाश्मी अक्षरश: गळ्यापर्यंत कर्जात बुडाला होता. चित्रपट, मालिकांमध्ये काम मिळत नसल्याने तो हवालदिल झाला होता. काम आणि कुटुंबाचा समतोल साधताना, श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) याच्यासारखीच त्याची कसरत सुरू होती.

एका मुलाखतीत शारीबने या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, “मी 33 व्या वर्षी ‘फूल टाईम’ हिरोच होण्याचे ठरविले. त्यावेळी लग्न होऊन एक मुल असताना हातची नोकरी सोडली. ऑडिशन देत फिरू लागलो; पण तीन वर्षे मला कामच मिळाले नाही.”

Advertisement

तो म्हणाला, की “जवळची सगळी बचत संपली. डोक्यावर कर्ज झालं. काम मिळत नसल्याने अखेर पुन्हा नोकरीवर जाऊ लागलो. एके दिवशी ‘जब तक है जान’ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावण आलं. या चित्रपटात मी सिलेक्ट झालो. त्यात लहानशी भूमिका मिळाली.”

‘जब तक है जान’मधील भूमिकेमुळं ‘फिल्मीस्तान’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तिथून करिअरला वेगळी दिशा मिळाली. पुढे अनेक चित्रपटात काम मिळत गेलं. डोक्यावरील कर्ज कमी झालं. ‘फॅमिली मॅन’मधील भूमिका म्हणजे, इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ असल्याचे सांगताना शारीब भावूक झाला होता.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement