SpreadIt News | Digital Newspaper

‘गावठी पोट्टे’ला मिळतोय दणक्यात प्रतिसाद; सहावा भागही झालाय रिलीज

अहमदनगर : ‘पिक्चरवाला’ या युट्युब चॅनेलने ‘गावठी पोट्टे’ ही मराठी वेबसिरीज आणली आहे. या सिरीजमध्ये ग्रामीण भागाचे बदलते भावरंग उलगडून दाखवण्यात येत आहेत. पहिल्या सिजनच्या पाच भाग आणि थीम सॉंगला जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच प्रेक्षकांनी प्रत्येक आठवड्यात एक भाग रिलीज करण्याची मागणी केल्याने वेळापत्रकात काही बदल करून सहावा भाग प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

याबाबत माहिती देताना निर्माती व कलाकार माधुरी चोभे यांनी सांगितले की, ‘सरपंचाच्या मळ्यात, जित्या-विक्या जाळ्यात’ हा सहावा भाग शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यालाही प्रेक्षकांनी दणक्यात प्रतिसाद दिला आहे. गावातील राजकीय कुरघोड्या, गावगुंडी आणि दरम्यान तरुण व छोट्या मुलांचे सुरू असणारे गावठी पराक्रम यामध्ये दाखवले जात आहेत. पुढे ही स्टोरी ग्रामीण विकासाच्या अंगाने जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी सर्व भाग पावेत.

Advertisement

गावठी पोट्टे 6 | सरपंचाच्या मळ्यात, जित्या-विक्या जाळ्यात | Gavathi Potte | Best Marathi Web series – YouTube
यावर प्रतिक्रिया देताना दिव्य मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक दीपक कांबळे यांनी म्हटले आहे की, चांगला विषय निवडला आहे, उर्वरीत भागातही अस्सल ग्रामीण राजकारणाची गावगुंडी पहायला मिळावी. एकूणच ग्रामीण राजकारणाचे कंगोरे उलगडून दाखवणारी ही वेबसिरीज सध्या महाराष्ट्रातील अबाल-वृद्धांना आवडत आहे. वेबसिरीज पाहून त्यावर कमेंट करण्यासाठी आजच https://www.youtube.com/c/Pikcharwala हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करण्याचे आवाहन श्रीमंत चोभे यांनी केले आहे.

Advertisement