SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू, राज्य सरकारकडून नवा आदेश जारी, नवी नियमावली जाणून घेण्यासाठी वाचा..!

राज्यात कोरोनाचा जोर ओसरत असल्याचे पाहून राज्य सरकारने पाच टप्प्यांत राज्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र, निर्बंध शिथिल होताच, रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढली. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष झाले नि काही दिवसांतच कोरोनाबाधितांची संख्या, तसेच मृतांचा आकडा वाढला.

आता राज्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चे आणखी एक संकट आले आहे. त्याचा धोका ओळखून राज्य सरकारने आज (ता.25) पुन्हा एकदा नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

Advertisement

राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता ‘पॉझिटिव्हिटी रेट’ किंवा ‘बेड ऑक्युपन्सी’चे प्रमाण कितीही कमी असले, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या टप्प्यातच असणार आहे.

Advertisement

आता निर्बंध शिथिल करायचे झाल्यास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 2 आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार निर्णय जाहीर केला जाणार आहे. मात्र, निर्बंध वाढविण्यासाठी दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या आदेशात काय म्हटलंय..?
– रेस्टॉरंट, हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुले ठेवता येतील. विकेंडला हॉटेल बंद राहिल, मात्र, ‘होम डिलिव्हरी’ करती येईल.
– आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल.

Advertisement

– जीम, सलून आणि स्पा दुकाने 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
– लसीकरणासाठी जनजागृती उपक्रम राबवावेत. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लस उपलब्ध करुन द्यावी.

– ‘टेस्टिंग-ट्रॅकिंग-ट्रिटमेंट’वर भर देण्यात यावा.
– कोरोना ‘व्हायरस’ पसरू नये, यासाठी ‘हेपा फिल्टर्स’ व ‘एक्झाॅस्ट फॅन’चा वापर करावा.
– कंटेनमेंट झोन तयार करावेत.
– लग्न समारंभ, रेस्टॉरंट, मॉल्स अशा गर्दीच्या ठिकाणी भरारी पथके नेमून तपासणी करावी.

Advertisement

‘डेल्टा प्लस’च्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू
दरम्यान, राज्यात ‘डेल्टा प्लस’चे 21 रुग्ण आढळून आले असून, त्यातील एका 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे येथे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement