महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची (Maharashtra SSC Exam Result) परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दहावी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक (Optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित केली जाणार आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या…
अकरावी प्रवेशासाठी ची सीईटी परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे.
सीईटी (CET) राज्य मंडळाच्या इ.10वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. या 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने 2 तासांची परीक्षा घेण्यात येईल.
या परीक्षेचे प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील
इ.१० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इ.११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल. pic.twitter.com/7L4PmAUAmT
Advertisement— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 24, 2021
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही पूर्णतः ऐच्छिक असल्याने इयत्ता 10वी चा निकाल साधारणत: 15 जुलै दरम्यान लागल्यानंतर 2 आठवड्यांमध्ये (जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडयामध्ये) राज्य मंडळ व परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठीचा पर्याय उपलब्ध करून देईल.
परीक्षा केंद्र : सामाईक प्रवेश परीक्षा ही शिक्षण आयुक्त यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येणार आहे.
शुल्काचं काय?
2020 21 या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही.
तर सीबीएससी आयसीएससी व इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना या सीईटी परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून परीक्षा परिषदेकडून शुल्क घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews