बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक..! लहान मुलांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप, पहा नेमका काय प्रकार आहे..?
सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या लहान मुलांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याबद्दल, तसेच शेजाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व धमकावल्याबद्दल बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली.
पायल रोहितगी, असे या हिरोईनचे नाव आहे. अहमदाबादमधील एका सोसायटीत ती राहते. चित्रपटात कमी नि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या पायलचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
अगदी राजकीय घडामोडींपासून बॉलिवूडमधील घराणेशाहीपर्यंत ती रोखठोक मते मांडत असल्याने अनेकदा ती अडचणीत आली आहे. मात्र, त्यानंतरही तिचे प्रताप सुरूच आहेत.
मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या पायल रोहतगीला पोलिसांनी केली अटक pic.twitter.com/NVKnDnHbRq
Advertisement— News18Lokmat (@News18lokmat) June 25, 2021
काही दिवसांपूर्वी पायलने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू (Pandit Nehru) यांचे वडील व काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयी एक व्हिडीओ बनविला होता. त्यात तिने मोतीलाल नेहरु यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती.
अखेर तिच्याविरुद्ध राजस्थान पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तेथील पोलिसांनी तिला अटकही केली होती. त्या प्रकरणातून अद्याप तिची पूर्णत: सुटका झालेली नसतानाच आणखी एक वाद पायलने अंगावर ओढून घेतला आहे.
आता पायलने सोसायटीतील आपल्या शेजाऱ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. खोट्या गुन्ह्यात त्यांना अडकविण्याची धमकी दिली. तसेच, सोसायटीच्या अध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी दिली.
सोसायटीच्या आवारात लहान मुले खेळताना दिसल्यास त्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी पायलने दिल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. पायलच्या वागण्यामुळे शेजारी त्रस्त झाल्याचे सांगण्यात आले.