SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

या पाकिस्तानला काय करावं..? कोरोना लसीकरणासाठी घेतलाय अजब निर्णय, पाहा तर खरं..!

कोरोनामुळे अवघे जग हवालदिल झालेय. अनेक देशांनी लसीकरणाचा वेग वाढविला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या जात आहेत. विविध प्रलोभने दाखवण्यात येत आहेत. लसीकरणाबाबत नागरिकामधील गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, आपल्या शेजारी देशाने पाकिस्तानने 12 जूनपासून 18 वर्षांवरील लोकांसाठी ‘वॉक-इन वॅक्सीनेशन’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत या वर्षाअखेर 70 दशलक्ष लोकांचे लसीकरण करण्याचे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

चीनच्या मदतीने पाकिस्तानने त्यांच्या देशात लसउत्पादन सुरू केले आहे. त्यांनी आपल्या लशीचे नाव ‘पाकवॅक’ असे ठेवले आहे. ‘पाकवॅक’सह चीनकडून आणि ‘कोवॅक्स’ योजनेतून मिळणाऱ्या लशींवरच पाकिस्तानची सगळी मदार आहे.

पाकिस्तानी सरकारने धार्मिक स्थळांबाहेर लसीकरण केंद्र, शिबिरे घेण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण मोहिमेत सुरुवातीला कॅन्सर व एड्सबाधित लोकांना प्राधान्य दिले जाणार आहे. कोरोना लस घेतल्यावर लोकांना सिनेमा, रेस्टॉरंट्स आणि विवाह सोहळ्यांला उपस्थित राहता येणार असल्याचे आदेश पाकिस्तानी सरकारने दिला आहे.

Advertisement

दरम्यान, पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. त्यासाठी नागरी व लष्करी सेवांमधील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या लाेकांचे सिमकार्ड ‘ब्लॉक’ करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला.

पाकीस्तानमधील लसीकरण मोहीम वेगात राबविण्यासाठी पंजाब सरकारने थेट लोकांचे सिमकार्ड ब्लॉक करण्याची धमकी दिली आहे. याबाबत स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement