SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सर्वात हलका स्मार्टफोन Mi 11 Lite भारतात लाँच, जाणून घ्या आकर्षक फीचर्स..

Xiaomi ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Mi 11 Lite लाँच केला आहे. हा सर्वात स्लीक आणि लाइट स्मार्टफोन आहे. Mi 11 lite स्मार्टफोनचा थिकनेस 6.8 mm आहे. तर वजन 157 ग्रॅम इतके आहे. iPhone 12 पेक्षा Mi 11 lite सर्वात जास्त पातळ स्मार्टफोन आहे, असा दावा शाओमीने केला आहे. Mi 11 lite स्मार्टफोन Tuscany Coral, Jazz Blue आणि Vinyl Black या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Mi 11 liteचे आकर्षक फिचर्स:

Advertisement

▪️ Mi 11 liteमध्ये 6.5 इंचाचा एक फ्लॅट OLED पॅनल आहे. हा स्मार्टफोन फूल एचडी प्लस एमोलेड डॉट डिस्प्लेसोबत आला आहे. 6.55 इंचाचा हा फुलएचडी + अ‍ॅमोलेड डिस्प्ले 20:9 स्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो.

▪️ हा स्मार्टफोन 90Hz स्क्रीन रिफ्रेश आणि 240 Hz टच सँपलिंग रेटसोबत आला आहे. तर हा स्मार्टफोन 10-bit डिस्प्ले सपोर्ट करणारा आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass 5 दिला आहे.

Advertisement

▪️ ट्रिपल रियर कॅमेरामध्ये प्राइमरी कॅमेरा 64MP, एक 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा व एक 5MP चा टेलिफोटो लेंस आहे. यामध्ये व्हिडिओ एडिटिंगचा सपोर्टही आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी एक 16MP चा कॅमेरा दिला आहे.

▪️ या स्मार्टफोनच्या 4G व्हेरियंटमध्ये Snapdragon 732G वापर केला गेला आहे. तर 5G कनेक्टिव्हीटीवाल्या व्हेरियंटमध्ये Snapdragon 780G चिपसेटचा सपोर्ट मिळेल.

Advertisement

▪️ दरम्यान 5G व्हेरियंटची लाँचिंग मागणीवर अवलंबून असेल. मी 11 लाइट मध्ये शाओमीने फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 4,250mAh ची बॅटरी दिली आहे. हि बॅटरी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते. हा फोन फक्त 30 मिनिटांत 0 वरून 59 टक्के चार्ज होऊ शकतो, असं कंपनीचं म्हणणं आहे.

Mi 11 liteची किंमत किंती?

Advertisement

▪️ Xiaomi Mi 11 Lite भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. या मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. तसेच, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

▪️ हा जबरदस्त स्मार्टफोन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटसह 28 जूनपासून mi.com, Mi Home, फ्लिपकार्ट आणि रिटेलस स्टोर्सवरून विकत घेता येईल. तुम्ही हा 25 जूनपासून प्री-ऑर्डरही करू शकता.

Advertisement

महत्वाचं: Mi 11 Lite या स्मार्टफोनच्या किंमतीत ऑफर्सनुसार कमी अधिक बदल होऊ शकतो. ई-कॉमर्स साईटवर खरेदी करताना हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक’ दिसल्यास नंतर खरेदी करावी.

Advertisement