SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

देव पावला..! लहान मुलांसाठीही आली कोरोना लस, पहा कधी सुरु होणार लसीकरण मोहीम..?

भारतात लसीकरण मोहिमेला गती आल्यापासून कोरोना संसर्ग कमी झाल्याचे दिसते आहे. मोदी सरकारने 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात केली असली, तरी लहान मुलांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत होता.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाच अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पालक चिंतेत असतानाच, एक दिलासादायक बातमी आली आहे. लहान मुलांसाठीही कोरोना लस विकसित करण्यात आली असून, लवकरच तिच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

‘झायकॉव्ह-डी’ (Zycov-D) असे या लसीचे नाव आहे. अहमदाबादमधील ‘झायडस कॅडिला’ (Zydus Cadila) या कंपनीने ही लस विकसित केली आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व रशियाच्या ‘स्पुटनिक-V’ नंतर भारतात वापरली जाणारी ही चौथी लस असेल. विशेष म्हणजे, ‘डीएनए’वर आधारित ही जगातली पहिलीच लस ठरणार आहे.

‘डीएनए-प्लाझ्मिड’ प्रकारची ही लस आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही लस जनुकीय घटकांचा वापर करते. कोरोना विषाणूत ‘म्युटेशन’ (बदल) झाले, तरी त्यानुसार या लशीत काही आठवड्यांत बदल करता येणार आहे.

Advertisement

‘झायकॉव्ह-डी’ या लशीचे मात्र तीन डोस घ्यावे लागतील. प्रत्येक डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असेल. ही लस सुईद्वारे नव्हे, तर ‘जेट इंजेक्टर’द्वारे (Jet Injector) दिली जाणार आहे. म्हणजे उच्च दाबाखाली व्यक्तीच्या त्वचेत ही लस दिली जाईल.

‘झायकॉव्ह-डी’ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा तयार झाला आहे. येत्या आठवड्यात भारतीय औषध नियामक प्राधिकरणाकडे (DGCI) या लसीच्या मंजुरीसाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

मुलांवर ‘साइड इफेक्ट्स’ नाहीत

प्रौढांसह 12 ते 18 वयोगटातील मुले, तसेच गंभीर विकाराच्या लोकांवर या लसीच्या चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत मुलांवर लसीचे ‘साइड इफेक्ट्स’ दिसलेले नाहीत. त्यामुळे लशीला परवानगी मिळाल्यास 18 वर्षांखालील मुलांना दिली जाणारी ही पहिली लस ठरेल. 5-12 वर्षांच्या मुलांवरही या लशीच्या चाचण्या होण्याची शक्यता आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement