SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 टॉप ट्रेंडिंग बातम्या

LPG ग्राहक आता बदलू शकतात आपला वितरक, कसं ते जाणून घ्या..

देशातील घरगुती गॅस वापरणा-या ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडून नवीन LPG गॅस सिलिंडर घेताना आपला वितरक बदलण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Advertisement

तुम्हाला www.mylpg.in वेबसाइटवर जाऊन एलपीजी आयडीसह लॉग इन करावे लागेल. लॉग इननंतर, जर तुम्ही आधी नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. वितरकाची निवड केल्यानंतर, मेलवर कन्फर्मेशनसाठी तुम्हाला एक फॉर्म पाठवला जाईल. तुम्ही वितरक बदलत आहात ही माहिती तुमच्या वर्तमान वितरकाकडे पाठवली जाईल. विद्यमान वितरक 3 दिवसांत तुमच्याशी फोनवर संपर्क साधून वितरक बदलू नये अशी विनंती करू शकतो. तरीही तुम्हाला वितरक बदलायचा असल्यास तुम्ही त्याला याविषयी कळवू शकता. तो तो आपले कनेक्शन नवीन वितरकाकडे त्वरित हस्तांतरित करेल.

ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स साईटवर आपल्याला फ्लॅश सेल दिसणं बंद होणार?

Advertisement

काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, नियमांमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश हा आहे की, या कायद्यामध्ये पारदर्शकता आणणे तसेच नियामक व्यवस्था आणखी मजबूत करणे हे आहे. काही विशिष्ट ई-कॉमर्स (E-commerce) संस्था ग्राहकांची निवड मर्यादित करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये प्लॅटफॉर्मवर विक्री करणाऱ्या एखादा विक्रेत्याकडे कोणतीही यादी किंवा ऑर्डरची पूर्तता करण्याची क्षमता असत नाही. मात्र, तरिही प्लॅटफॉर्मद्वारे नियंत्रित दुसर्‍या विक्रेत्यास फक्त ‘फ्लॅश किंवा बॅक-टू-बॅक’ ऑर्डर देत राहण्याचा प्रकार आढळून येतो. या नव्या बदलांच्या प्रस्तावामध्ये फ्लॅश सेलवर बंदी घालण्याची योजना आहे. यानुसार ई-कॉमर्स कंपन्या आता आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑफर केली जाणारी सेवा अथवा प्रोडक्ट्ससाठी फ्लॅश सेल आयोजित करु शकत नाही.

नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देतानाच पदांनाही मंजुरी द्या..

Advertisement

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्णत्वाला नेली जावीत. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना (Health organization) मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम (Priority) निश्चित केला जावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज दिल्या.

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातील कुठल्या सुविधा भविष्यात कायम स्वरुपी ठेवता येतील व कोणत्या सेवांचे श्रेणीवर्धन करता येईल, याचा आराखडा तयार करावा. नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देतानाच पदांनाही मंजुरी दिल्यास कालापव्यय टाळता येईल. मेळघाट, जव्हार, मोखाडा यासारख्या आदिवासी भागातील आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Advertisement

चीनला जोरदार झटका देण्याची तयारी, भारतात बनणार स्वस्त मोबाइल आणि स्मार्ट टीव्ही

सॅमसंगचे दक्षिण-पश्चिम आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केन कांग यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. सॅमसंगतर्फे सांगण्यात आले की, उत्तर प्रदेशातील डिस्प्ले निर्मितीसाठी एक चांगले औद्योगिक वातावरण आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणाचे आश्वासन देण्यात आले आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत सॅमसंगने चीनमध्ये असणार्‍या डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भारतात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसंग सारख्या कंपन्यांच्या देशात डिस्प्लेच्या निर्मितीमुळे स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीच्या किंमती नियंत्रणात ठेवता येऊ शकतात.

पुणे: मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

Advertisement

शाळेत मुलीचे ॲडमिशन न झाल्यामुळे ई-मेलद्वारे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या व्यक्तीला पुणे पोलिसांनी घोरपडी येथून ताब्यात घेतले. मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा ई-मेल (E-Mail) काल संध्याकाळी 6 वाजता प्राप्त झाल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला. मात्र कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही. मात्र खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश शिंदे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नसल्याने चिडलेल्या शैलेशने गृह विभागाला धमकीचा मेल केला असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement