SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, राज्य सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय, जाणून घेण्यासाठी वाचा..!

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण अवैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी दिला. त्यानंतर मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी (ता.21) गंगापूर रोडवर खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली दुसरे राज्यस्तरीय मूक आंदोलन करण्यात आले. त्यावेळी संभाजी राजे यांनी राज्य सरकारने काही दिवसांची मुदत मागितली असून, त्यामुळे महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाहीर केले होते.

Advertisement

संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच एक बैठक झाली. त्यात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या होत्या.

‘सारथी’ला स्वायत्तता देऊन आर्थिक सक्षमीकरण करावे. मराठा मुलांसाठी वसतीगृह सुरू करावीत, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, नियुक्तीच्या प्रतीक्षेतील मराठा तरुणांना अधिसंख्य पदे निर्माण करून किंवा विशेष बाब म्हणून नियुक्त्या देण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली होती.

Advertisement

संभाजीराजे यांच्या मागणीनुसार, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेत गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरित ‘अॅनेक्शर्स’ भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केल्याची माहिती संभाजीराजे यांनी ‘ट्विट’द्वारे दिली आहे.

Advertisement

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सातत्याने कायद्याची लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारनेही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement