SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून घडले नागपूर हत्याकांड..! असे घडले थरारनाट्य..!

नागपूरमध्ये मेहुणी, सासूसह कुटुंबातील ५ जणांची हत्या करून नंतर एकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. या हत्याकांडामागे नाजूक कारण असल्याचे समोर आले आहे.

आलोक माटूरकर या हत्याकांडातील आरोपी असून, सगळ्यांचा खून केल्यावर त्यानेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत या हत्याकांडाचे गूढ उकलले.

Advertisement

या हत्याकांडामागची पार्श्वभूमी थक्क करणारी आहे. आलोक याने 15 वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला बहिष्कृतच केले होते. मात्र, त्याची पर्वा न करता, मोठ्या कष्टातून त्याने संसार फुलवला. पत्नी विजया, तसेच मुलगा साहिल व मुलगी परी यांच्यावर त्याचा मोठा जीव होता.

सरळ, साधे आयुष्य जगणारा आलोक असे काही आक्रित करील, यावर आजही कोणाचाच विश्वास बसत नाही. या थरारकांडाला अनैतिक संबंध, आलोकची शरीरसंबंधाबाबतची विकृती अन् त्यातून निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत असल्याचे पुढे आले.

Advertisement

आलोकच्या लग्नाच्या वेळी त्याची मेव्हणी आमिषा केवळ ५ ते ७ वर्षांची होती. ती बराच काळ आलोककडेच राहिली. त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. दुप्पट वयाचे भावोजी नंतर तिला आवडेनासे झाले. आलोकला नंतर ती टाळू लागली. मात्र, आलोकला हे सहन झाले नाही. बऱ्याचदा तो तिला मारहाण करीत असे, तिच्यावर हक्क दाखवत असे.

आलोकच्या मेहुणीने रविवारी (ता.20) रात्री 11.15 वाजता आपल्या मित्राला फोन करून, आलोक यास आवर, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे सांगितले. आलोक व त्याच्या सासूमध्येही आलोकच्या घरी कडाक्याचे भांडण झाले. आलोकच्या संतापाचा भडका उडाला. या सर्व प्रकाराला मेहुणीच जबाबदार असल्याचे त्याला वाटले.

Advertisement

रागाच्या भरात तो रात्रीच सासऱ्याच्या घरी पोहचला. धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याने मेहुणी आमिषावर बलात्कार केला. नंतर चाकूने गळा चिरून त्याने तिची हत्या केली. तेथून निघत असतानाच, दारावर सासू येऊन धडकली. त्यामुळे त्याने सासूचीही गळा कापून हत्या केली.

मध्यरात्री त्याने पत्नीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने नकार दिल्याने त्याने पत्नीचाही खून केला. त्या आवाजाने मुले जागे झाले. त्यामुळे त्याने मुलीचे हातपाय बांधून तिच्या डोक्यावर हातोड्याचे घाव घातले. नंतर मुलाच्याही तोंडावर उशी दाबून त्यालाही संपविले. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून हा निष्कर्ष काढला आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement